मुंबई -व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे. हा दिवस प्रेमी युगुलांसाठी खूप विशेष असतो. व्हॅलेंटाईन डे असा एक दिवस आहे, जेव्हा प्रेमी युगुल आपल्या मनातील गोष्टी किंवा काही भेटवस्तू देऊन एकमेकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. या दिवशी अनेक जोडपे आपले नाते घट्ट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. आता या विशेष दिवशी आपल्या जोडीदाराला खुश करायचं असेल तर, तुम्ही काही सुंदर मराठी गाणी आपल्या जोडीदाराला ऐकवू शकता. आता आम्ही अशा काही विशेष मराठी गाण्याबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला गोष्ट ऐकायला खूप आवडेल.
1 'आभास हा' :'यंदा कर्तव्य आहे' या चित्रपटातील 'आभास हा' हे गाणं खूप लोकप्रिय आहे. राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे सुंदर गाणं नवविवाह जोडप्यांवर आधारित आहे. या गाण्यात अंकुश चौधरी आणि स्मिता शेवाळे हे कलाकार आहेत. या गाण्याला संगीत निलेश मोहरीर यांनी दिलं आहे.'यंदा कर्तव्य आहे' चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.
2 'मला वेड लागले प्रेमाचे' :'टाईमपास' चित्रपटामधील या किशोरवयीन प्रेमकथेतील आधारित 'मला वेड लागले प्रेमाचे' हे गाणं खूप विशेष आहे. या गाण्यात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब हे कलाकार आहेत. हे गाणं स्वप्नील बांदोडकर यांनी गायलं आहे. याशिवाय या गाण्याला चिनार-महेश यांनी संगीत दिलं आहे. तसेच 'मला वेड लागले प्रेमाचे' गाण्याला गुरु ठाकूर यांनी लिहिलं आहे.