महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच अडकणार लग्नबंधनात, केळवणमधील फोटो व्हायरल - RESHMA SHINDE

टीव्ही स्टार रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकणार आहे. आता सोशल मीडियावर तिच्या केळवणमधील फोटो व्हायरल झाले आहेत.

Reshma shinde
रेश्मा शिंदे (Photo- instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 12:04 PM IST

मुंबई -सध्या कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी लग्न करत आहेत. आता अलीकडेच अभिनेता निखिल राजेशिर्केनं लग्नाच्या बेडीत अडकून त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. दरम्यान 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे देखील लग्नाच्या तयारीत आहे. रेश्माच्या घरी लगीनघाई सुरू आहे. अलीकडेच रेश्माचं केळवण पार पडलंय. आता तिचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये ती खूप खुश असल्याची दिसत आहे. या फोटोवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षा करत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रेश्मा शिंदे आपल्या मित्रमंडळीबरोबर धमाल करताना दिसत आहे.

रेश्मा शिंदे अडकणार लग्नबंधनात : रेश्मानं केळवणसाठी हिरव्या रंगाची साडी नेसून त्यावर अगदी साधा मेकअप केला आहे. यामध्ये ती खूप देखणी दिसत आहे. रेश्मा शिंदे हा मराठी टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा आहे. तिचा अभिनय अनेकांना आवडतो. दरम्यान 'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं केळवण मोठ्या थाटामाटात केलं. फोटोत ऋतुजा बागवे, अनघा भगरे, हर्षदा खानविलकर, सुयश टिळक, शाल्मली तोळ्ये, आशुतोष गोखले हे कलाकार रेश्माबरोबर दिसत आहेत. आता त्यांचा हा फोटो अनेकांना पसंत पडत आहे. या फोटोला अनेकांनी लाईक केलंय.

रेश्मा शिंदेचं करिअर : रेश्मानं 'लगोरी -मैत्री रिटर्न्स' या मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये झळकली. याशिवाय ती काही चित्रपटामध्ये देखील दिसली आहे. तिला खरी ओळख 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून मिळाली. या शोमुळे रेश्मा प्रसिद्धझोतात आली. या मालिकेत तिनं दीपा नावच्या मुलीची भूमिका साकारली होती. आता सध्या ती 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत आहे. रेश्मा छोट्या पडद्यावर 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. सध्या रेश्माच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही, मात्र ती डिसेंबर लग्न करू शकते असा अंदाज बांधला जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details