मुंबई -येत्या 14 फेब्रुवारी रोजी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला 'छावा' चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. 'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि रश्मिका मंदान्ना यांच्या डान्स सीन बाबत, मराठा क्रांती मोर्चा विरोध करत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज पुण्यातील लाल महाल येथे आंदोलन करत छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत दाखवण्यात आलेल्या या प्रसंगाला वगळण्यात यावं, याबद्दल मागणी केली आहे. जर असं न झाल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा त्यांनी इशारा दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचा 'छावा' चित्रपटाला विरोध : आगामी हिंदी 'छावा' चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील चुकीच्या आणि खोट्या प्रसंगांना मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे. विकी कौशलच्या आगामी हिंदी चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आले आहेत. हे प्रसंग काढण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा 'छावा' चित्रपट चर्चेत आला आहे.
मराठा समाज (etv bharat : reporter) मराठा समाज (etv bharat : reporter) मराठा क्रांती मोर्चाची मागणी: दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन अडेकर यांनी याप्रकरणी म्हटलं की, "जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत, ज्यांच्या दरबारात स्त्री अथवा नर्तकी कधीच नाचली नाही, असं असताना 'छावा' या चित्रपटात राज्याभिषेक सोहळ्यात युवराज संभाजी राजे नाचताना दाखवले आहेत. तसेच महाराणी येसूबाई या देखील चित्रपटात नृत्य करताना दाखवल्या गेल्या आहेत. या दोन्ही गोष्टी आक्षेपार्ह असून निर्मात्यांनी त्वरित हे दोन्ही प्रसंग चित्रपटातून वगळावे, अन्यथा मराठा समाज आणि शिवप्रेमी हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊन देणार नाही." दरम्यान 'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. सुरुवातीला हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार होता. मात्र काही समस्यांमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली.
हेही वाचा :
- विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ...
- 'महाराणी येसूबाईं'च्या भूमिकेतील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक, 'छावा'च्या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू
- विकी कौशल स्टारर 'छावा'चा ट्रेलर कधी होईल प्रदर्शित, जाणून घ्या तारीख...