महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर अर्जुन कपूर मलायकाच्या पाठिशी खंबीर - arjun kapoor - ARJUN KAPOOR

Malaika Arora Father Death : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अर्जुन कपूरनं या दुःखाच्या वेळी मलायकाला खंबीर पाठिंबा दिला आहे. या कठीण प्रसंगी अर्जुननं मलायकाच्या घरी भेट दिली. तिचं आणि कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

Malaika Arora
मलायका अरोरा (Arjun Kapoor Rushes To Visit Malaika Arora's Family (Photo: IANS, ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 4:17 PM IST

Updated : Sep 12, 2024, 9:16 AM IST

मुंबई - Malaika Arora Father Death :अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केल्याचं वृत समोर आलं आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचं समजत आहे. मलायकाच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिचा कथित एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरनं बुधवारी 11 सप्टेंबर रोजी तिच्या वडिलांच्या मुंबईतील घरी भेट दिली. मलायका आणि तिच्या कुटुंबियांना कठीण काळात अर्जुन कपूर हा पाठिंबा देताना दिसत आहे. मलायका अरोराच्या वडीलांनी आत्महत्या केल्याची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे. त्यांनी राहात असलेल्या मुंबईतील वांद्रे येथील इमारतीच्या छतावरुन उडी मारल्याचं समोर आलं आहे.

मलायका अरोरा वडिलांचा मृत्यू (Arjun Kapoor Rushes To Visit Malaika Arora's Family (Video: ETV Bharat))

अर्जुन कपूरनं दिला मलायका अरोराला पाठिंबा :अनिल मेहता यांच्या घराबाहेर अर्जुन कपूर हा कोपऱ्यात उभा राहून ओल्या डोळ्यांनी रडताना स्पॉट झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अर्जुन हा सलमान खानच्या कुटुंबीयांसमोर हात जोडताना दिसत आहे. या व्हिडिओवर आता अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मलायकाची पहिली झलकही समोर आली आहे. ती घरी गोंधळात घाईघाईनं येताना दिसत आहे. घटनेच्या वेळी मलायका पुण्यात होती आणि दु:खद बातमी ऐकून ती मुंबईला परतली.

मुंबई पोलिसांचा तपास :आता मलायकाच्या घरी या दुःखामध्ये तिला पाठिंबा देण्यासाठी इंडस्ट्रीतील तिचे मित्रही घरी पोहोचताना दिसत आहेत. मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी कुठल्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी मुंबई पोलीस तपास करत आहेत. सध्या या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचाही तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल यांनी आपल्या वांद्रे येथील घराच्या टेरेसवरून उडी मारून हे जीवघेणे पाऊल उचलले. या घटनेबाबत कुटुंबानं अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. मलायका अरोराच्या कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ असून या दुःखाच्या क्षणी तिचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील लोकही तिला पाठिंबा देत आहेत.

हेही वाचा :

  1. मलायका अरोरावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडील अनिल अरोरा यांची आत्महत्या - ANIL ARORA
  2. ब्रेकअपच्या चर्चेमध्ये गर्दीत मलायका अरोरानं केलं अर्जुन कपूरकडे दुर्लक्ष - MALAIKA and ARJUNs video viral
  3. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर याचं काय चाललंय? ब्रेकअपची चर्चा असतानाच दोघंही मुंबई विमानतळावर झाले स्पॉट... - Malaika Arora and Arjun Kapoor
Last Updated : Sep 12, 2024, 9:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details