मुंबई - Amrita Arora Birthday : अभिनेत्री मलायका अरोराची धाकटी बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा आज 31 जानेवारीला तिचा 43वा वाढदिवस साजरा करतेय. दरम्यान मलायकानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमृता अरोरासोबत मलायका अरोरा, करीना कपूर आणि करिश्मा या अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. अमृतानं बेबोला करीनाला घट्ट मिठी मारून कॅमेरासमोर पोझ दिली आहे. याशिवाय या वाढदिवसाचे सेलिब्रेशन हे विशेष बनविण्यासाठी सर्वांनी टोपी घातलेली आहे. या पार्टीसाठी सर्वांनी काळा ड्रेस कोड निवडला आहे.
करीना कपूरनं अमृता अरोराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या :अभिनेत्री करीना कपूरनं देखील इंस्टाग्रामवर अमृता अरोरासोबतच्या थ्रोबॅक फोटोंचा व्हिडिओ पोस्ट केला आहेत. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''आमच्या मनातील राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझे तुझ्यावर सदैव प्रेम आहे. कायम आनंदी राहा अमू.'' या व्हिडिओच्या माध्यमातून करिनानं अमृतासोबतच्या तिच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. करीना कपूर आणि अमृता अरोरामध्ये खूप घट्ट मैत्री आहे. अमृतानं 'आवारा पागल दीवाना'(2002), गोलमाल रिटर्न्स (2009) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिला चित्रपटसृष्टीत फार यश मिळू शकलं नाही. अमृता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.