मुंबई - Guntur Kaaram : 12 जानेवारी रोजी, बॉक्स ऑफिसवर एकूण पाच साऊथ आणि काही बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी दोन चित्रपट साऊथ चित्रपट 'गुंटूर कारम' आणि 'हनुमान'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. 'गुंटूर कारम' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता महेश बाबू होता, तर 'हनुमान'मध्ये प्रमुख भूमिकेत तेजा सज्जा होता. या दोन्ही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. दरम्यान महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' हा चित्रपट लवकरत ओटीटीवर रिलीज होत असल्याचं समजत आहे. ओटीटीवर रिलीज झाल्याच्या घोषणानंतर आता अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
'गुंटूर कारम' हा चित्रपट कधी होणार ओटीटीवर रिलीज : नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ही बातमी शेअर करण्यात आली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, ''राऊडी रमन आग लावण्यासाठी येत आहे. 'गुंटूर करम' नेटफ्लिक्सवर 9 फेब्रुवारीला तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.'' या पोस्टवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी कमेंटमध्ये फायर इमोजी वापरण्यास सुरुवात केली आहे. 'गुंटूर कारम' या चित्रपटाद्वारे महेश बाबू खूप दिवसांनंतर चाहत्यांना रुपेरी पडद्यावर दिसला आहे. 'गुंटूर कारम'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटानं देशांतर्गत 123 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय जगभरात बॉक्स ऑफिसवर 177.14 कोटीची कमाई या चित्रपटानं केली आहे.