ETV Bharat / state

"५ तारखेला शपथ घेऊ म्हणत आहेत, बावनकुळे राज्यपाल आहेत का?" - संजय राऊत

महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपूनही सरकार स्थापन करण्यात आले नाही. यावरून खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला.

Maharashtra Gov formatio
महायुती सरकार स्थापन तिढा संजय राऊतांचे आरोप (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Updated : 1 hours ago

मुंबई- "महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या पाठिंब्यानं घटनाबाह्य सरकार होते. भाजपाकडे बहुमत असून त्यांनी अजून सरकार स्थापन केलेलं नाही. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव द्यावा", अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी खासदार राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशांवरदेखील आगपाखड केली.

महायुतीनं विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवूनही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, " ५ तारखेला शपथ घेऊ, असे बावनकुळे (भाजपाचे प्रदेशाध्यक्ष) म्हणत आहेत. ते राज्यपाल आहेत का? त्यांना राज्यपालांचे अधिकार आहेत का? शपथविधीबाबत राज्यपालांना कळवलयं का?"

  • शिवसेनेचे अध्यक्ष तथा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी राहिले आहेत. ते आजारी असल्यानं त्यांना डॉक्टरांनी सलाईन लावलं होते. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमधील तिढा आणि सरकार स्थापनेतील विलंबावरून खासदार राऊतांनी शिंदे यांना टोला लगावला आहे. " शिंदेंना डॉक्टरची गरज आहे की मांत्रिकाची गरज आहे? एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक आहे. शपथविधीसाठी शिंदे एअर रुग्णवाहिकेनं मुंबईत येऊ शकतात".

लोकशाही संपविण्याचे प्रयत्न चालू- विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पराभवाबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले, "ईव्हीएम आणि पैशांचा गैरवापर झाल्यानं आमचा पराभव झाला. 95 वर्षांच्या योद्धानं बाबा आढाव यांनी (पुण्यात) आंदोलन केले. आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. पुढील आंदोलनासाठी रणनीती आखण्याचं काम सुरू आहे. बहुमत असतानाही भाजपाचा गटनेता ठरला नाही. निकाल लागूल 10 दिवस उलटले तरी सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. आम्ही प्रश्न विचारले तर संसदेचे कामकाज बरखास्त करण्यात येते. हे अधिवेशन सागर बंगल्यावर किंवा नागपूरला घेण्यात येईल. लोकशाही संपविण्याचे प्रयत्न चालू आहेत".

  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी एक्स मीडियात पोस्ट करून महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला, आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता होणार असल्याचं म्हटलं आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर राहणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली.

उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्मक्लेश आंदोलन करणाऱ्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची शनिवारी पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मतदानातील आकडेवारीबाबत संशय व्यक्त करत महायुतीवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, " लोकशाहीत माझे मत कुठे जाते, हे जाणून घेण्याचा अधिकार काढून घेतला आहे. फेरमतदानात व्हीव्हीपॅटवरील मत का घेण्यात येत नाहीत? शेवटच्या तासात गर्दी वाढल्याची आकडेवारी आली आहे. अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांच्या अंदाजानुसार शेवटच्या तासात प्रत्येक मतदान केंद्रात सरासरी १ हजार लोकांची गर्दी झालेली दिसली नाही. राजभवनावर जाण्याऐवजी त्यांना (काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) शेतात जावे लागत आहे. विधानसभेची मुदत संपूनही राष्ट्रपती राजवट का लागू होत नाही? सत्ता स्थापनेचा दावा का केला जात नाही".

हेही वाचा-

  1. "मुख्यमंत्री भाजपाचाच तर उपमुख्यमंत्री..."; अजित पवारांचं मोठं विधान, स्वप्न पाहणारे क्लिन बोल्ड?
  2. महायुतीमधील दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष; परस्पर विरोधी गुन्हा दाखल
  3. तब्येत बिघडल्यानं एकनाथ शिंदे 'सलाईन'वर; न भेटताच दीपक केसरकर महाबळेश्वरमधून माघारी परतले

Last Updated : 1 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.