ETV Bharat / health-and-lifestyle

का साजरा केला जातो जागतिक एड्स दिवस? जाणून घ्या थीम आणि इतिहास

दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि थीम..

World AIDS Day 2024
जागतिक एड्स दिवस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : 2 hours ago

World AIDS Day 2024: ए़ड्स संबंधित जागृती व्हावी या उद्देशानं दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागितक एड्स दिवस साजरा केला जातो. हा एक साथीचा रोग असून एक व्यक्तीद्वारे दुसऱ्यांना होवू शकतो. ह्युमन इम्युनो डेफिशियन्शी व्हायरसमुळे हा रोग होतो. एड्स बाधित लोकांसाठी समाजात चांगलं वातावरण निर्माण व्हावं या उद्देश हा दिवस साजरा करतात. सन 1988 साली पहिल्यांदा जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला.

  • इतिहास: थॉमस नेटर आणि जेम्स डब्लू. बन यांनी एड्स दिवस साजरा करण्यात यावा अशी संकल्पना 1987 मध्ये मांडली. त्यानंतर 1988 मध्ये 1 डिसेंबर रोजी पहिल्यांदा जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला. यामागील उद्देश म्हणजे एड्स बद्दल जनजागृती व्हावी हे आहे. कारण एड्स हा रोग लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही होवू शकतो. तसंच या आजारावर आजपर्यंत कोणतंही कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाही.
  • एड्सचा आकडा: संपूर्ण जगामध्ये 36.9 दशलक्ष लोक एचआयव्ही एड्सने ग्रस्त आहेत. भारतामध्ये एड्सचे 2.1 दशलक्ष रुग्ण आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये एचआव्ही संसर्ग होण्याचे प्रमाण दुप्पट आहे.
  • थीम: 'टेक द राइट पाथ' ही जागतिक एड्स दिवसाची यंदाची थीम आहे. दरवर्षी वेगवेगळ्या थीमनुसार एड्स दिवस साजरा केला जातो.
  • एड्स संसर्गाची लक्षणं खालीलप्रमाणे आहेत
  • सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे.
  • थंडी वाजून ताप येणे.
  • अशक्तपणा आणि थकवा जाणवने
  • अचानक वजन कमी होणे
  • डोकेदुखी आणि घसा खवखवणे
  • दृष्टी कमी होणे
  • शरीरावर लाल ठिपके येणे
  • जीभ आणि तोंडावर पांढरे डाग
  • कोरडा खोकला आणि अतिसार
  • श्वास घेण्यात अडचण
  • रात्री घाम येणे
  • अशाप्रकार पसरतो एड्स
  • संक्रमित व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यास एड्स होतो.
  • संक्रमित व्यक्तीच्या रक्ताची दूषित सिरिंज किंवा सुई वापरल्यास ए़ड्स होतो.
  • संक्रिमित व्यक्तीचे रक्त प्रोडक्टसच्या संपर्कात आल्यास एड्स होते.
  • एचआव्ही पॉझिटिव्ह आईकडून तिच्या बाळाला एड्स लागण होण्याची शक्यता असते.

हेही वाचा

  1. जागतिक शाकाहारी दिवस: जाणून घ्या मांसाहाराशिवाय कसं मिळवावं व्हिटॅमीन बी 12 - World Vegetarian Day 2024
  2. ह्रदयरोग कसा टाळावा? दरवर्षी 18.6 दशलक्षाहून अधिक जणांचा होतो मृत्यू - World Heart Day 2024
  3. जागतिक प्रथमोपचार दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास, थीम आणि महत्व - World First Aid Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.