महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बॉलिवूडमधून महाकुंभ 2025 मेळ्यात कोण जाणार, घ्या जाणून... - MAHAKUMBH 2025

महाकुंभ 2025 मेळा सुरू होण्यासाठी फक्त 4 दिवस उरले आहेत. आता बॉलिवूडमधून प्रयागराजमध्ये कोण स्टार्स जाणार आहेत, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

mahakumbh 2025
महाकुंभ 2025 (महाकुंभ 2025 (Poster/IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : 20 hours ago

मुंबई :12 वर्षांनंतर प्रयागराजमध्ये पुन्हा एकदा महाकुंभमेळा भरणार आहे. महाकुंभ मेळा 13 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान भरणार असून इथे देश-विदेशातील पर्यटक भेट देण्यासाठी येणार आहेत. या भव्य मेळ्यात, यात्रेकरू संगमात स्नान करतील. आता या ठिकाणी बॉलिवूड स्टार्स देखील पोहोचणार आहेत, यामध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक स्टार्सची नावे आहेत. अमिताभ बच्चन यांना महाकुंभ मेळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन हे गंगा नदीच्या काठावरील प्रयागराज (अलाहाबाद) येथील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी गंगा नदी काठी जाणं हे खूप भावनिक असेल. याशिवाय अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता नंदन हे देखील महाकुंभ मेळ्याला जाऊ शकतात.

ब्रह्मास्त्रची टीम कुंभमेळ्याला जाईल : महाकुंभ मेळ्याला फक्त बॉलिवूडच नाही तर, अनेक टॉलिवूड स्टार्सही जाणार असल्याचं समजत आहे. तसेच बॉलिवूड स्टार्समध्ये ,विवेक ओबेरॉय आशुतोष राणा आणि राजपाल यादव यांच्यासह अनेक स्टार येथे पोहोचू शकतात. दोन आठवडे चालणाऱ्या या भव्य मेळ्यात हे स्टार्स कोणत्या दिवशी येतील हे अद्याप उघड झालेलं नाही. आता प्रशासनानं देखील मेळ्यातील सुरक्षेची पूर्ण तयारी केली आहे. याशिवाय संगीताच्या जगातून, शंकर महादेवन, सोनू निगम, कैलाश खेर, मालिनी अवस्थी, मैथिली ठाकूर, श्रेया घोषाल, कविता पौडवाल, आणि जुबिन नौटियाल हे गायक या मेळ्यात गाताना दिसतील. गंगा नदीच्या काठावर या कलाकारांची सुमधुर संगीत आता चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे.

महाकुंभ मेळ्याबद्दल : दर 12 वर्षांनी हा मेळा देशातील चार शहरांमध्ये, प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकमध्ये भरतो. प्रयागराजमधील महाकुंभ मेळा सर्वात मोठा आहे. यावेळी येथे एक डोम सिटी बांधण्यात आली आहे, जिथून महाकुंभाचे 360 अंश दृश्य दिसेल. डोम सिटीमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे 1 लाख 10 हजार रुपये आहे. डोम सिटीच्या खाली कॉटेज देखील तयार करण्यात आले आहेत. याचे भाडे 81 हजार रुपये आहे. आता यावेळी महाकुंभ मेळ्यामध्ये स्टार्सला पाहण्याची संधी चाहत्यांना मिळेल.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं नवीन वर्षाचं स्वागत केलं जल्लोषात, व्हिडिओ व्हायरल
  2. बिग बींच्या 'चुप' पोस्टमुळे नेटिझन्स गोंधळात, अनेक तर्कवितर्कांना उधाण
  3. रणबीर कपूरची पत्नी म्हटल्यानंतर आलिया भट्टचे चाहते पापाराझीवर भडकले

ABOUT THE AUTHOR

...view details