मुंबई - Gudi Padwa 2024 :गुढीपाडव्याचा सण सर्वसामान्यांमध्येच नाही तर चित्रपटसृष्टीतही जल्लोषानं साजरा केला जात आहे. बी-टाऊनचे सेलिब्रिटी आज 9 एप्रिल रोजी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. रितेश देशमुख, माधुरी दीक्षित आणि इतर सेलिब्रिटींनीही त्यांच्या चाहत्यांबरोबर गुढीपाडव्याची खास झलक शेअर केली आहे. मंगळवारी माधुरी दीक्षितनं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर गुढीपाडव्याचा व्हिडिओ शेअर केला. माधुरीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''गुढी पाडव्याच्या शुभेच्छा.'' या खास प्रसंगी तिनं महाराष्ट्राच्या पद्धतीनं साडी घातली आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहेत. याशिवाय तिनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण तिला या विशेष दिवसाच्या शुभेच्छादेखील देत आहेत.
माधुरी आणि रितेशचा व्हिडिओ व्हायरल : माधुरीचे अनेक चाहते तिच्या महाराष्ट्रीयनं लूकचं कौतुक करताना दिसत आहेत. माधुरीनं या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. यावर तिनं सोन्याचे दागिने घातले आहेत. याशिवाय तिनं कपाळावर टिकली लावली आहे. पारंपारिक लूकमध्ये माधुरी खूप हटके दिसत आहे. दुसरीकडे रितेश देशमुख एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो आपल्या मुलांबरोबर पूजेची तयारी करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. अनेकजण रितेश कौतुक करत आहे. मराठी संस्कृती जपत असल्याचं चाहत्यांनी कमेंट्स करून म्हटलं आहे.