महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या कमाईत सुधारणा, पण 'मडगाव एक्सप्रेस'च्या शर्यतीत पिछाडी - Veer Savarkar Box Office - VEER SAVARKAR BOX OFFICE

Veer Savarkar Box Office : कुणाल खेमूचा 'मडगाव एक्स्प्रेस' आणि रणदीप हुडाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' एकाच दिवशी चित्रपटगृहात धडकले आणि बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपट आतापर्यंत या शर्यतीत आघाडीवर आहे. रणदीप हुडाच्या चित्रपटाने 10 व्या दिवशी पूर्वीपेक्षा जास्त कामगिरी केली आहे.

Veer Savarkar Box Office
'स्वातंत्र्य वीर सावरकर' बॉक्स ऑफिस

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 5:04 PM IST

मुंबई - Veer Savarkar Box Office : अभिनेता कुणाल खेमू यानं पहिल्यांदा दिग्दर्शित केलेला 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपट यशस्वी झाला. दिव्येंदू, प्रतिक गांधी, नोरा फतेही आणि अविनाश तिवारी यांचा समावेश असलेल्या कॉमेडी चित्रपटाने सकारात्मक समीक्षा आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दुसरीकडे, रणदीप हुड्डा दिग्दर्शित पदार्पणाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, 'मडगाव एक्स्प्रेस'साठी कठीण स्पर्धा तयार होईल असे वाटलं होतं पण बॉक्स ऑफिसवरील आकड्यांनी पदरात निराशा पडली आहे.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार 'मडगाव एक्स्प्रेस'ने रिलीजच्या दहा दिवसांनंतर भारतात एकूण 1.45 कोटी जमा केले. यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 17.10 कोटी झालं. चित्रपटाने रविवार 31 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये 44.69% हिंदी व्यवसाय दर गाठला होता.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाकडून विकेंडला चांगली कमाई होण्याची अपेक्षा होती. मात्र या चित्रपटानं रविवारी 1.90 कोटी रुपयांची कमाई केली. आजवर या चित्रपटाची एकूण कमाई 15.85 कोटी रुपयांची झाली आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटाने कुणाल खेमू दिग्दर्शित प्रतिस्पर्धी 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपटाला अजून मागे टाकलेलं नाही.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बोयोपिक चित्रपट आहे. रणदीप हुड्डाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय आणि सावरकरांची भूमिकाही साकारली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाविषयी चित्रपटरसिक आणि राजकारण्यांमध्ये टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.

या दोन्ही चित्रपटांना सध्या करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनच्या हिस्ट कॉमेडी 'क्रू' चित्रपटाकडून स्पर्धा होत आहे. अलीकडेच रिलीज झालेला, 'क्रू' हा चित्रपट हिंदीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांधला एक महिला केंद्रीत चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा -

  1. करीना, क्रिती, तब्बूच्या 'क्रू'ची उंच भरारी, तीन दिवसांत 30 कोटींची कमाई - Crew Box Office Day 3
  2. टायगर श्रॉफनं अक्षय कुमारला केलं 'एप्रिल फूल', प्रॅंक व्हिडिओ व्हायरल - APRIL FOOL
  3. अजय देवगण आणि आर माधवन अभिनीत चित्रपट 'शैतान' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - shaitaan Movie

ABOUT THE AUTHOR

...view details