मुंबई - Laapataa Ladies trailer releases :सुपरस्टार आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव प्रदीर्घ काळानंतर फिल्मी दुनियेत कमबॅक करत आहे. किरण राव सध्या तिच्या 'लापता लेडीज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'लापता लेडीज' हा तिचा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. आज 24 जानेवारीला'लापता लेडीज'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा खूप कॉमेडी आहे. 'लापता लेडीज'चा ट्रेलर 2.25 मिनिटांचा आहे. या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन आणि छाया कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत.
'लापता लेडीज'चं ट्रेलर रिलीज : 'लापता लेडीज'च्या ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर एक माणूस लग्न करून आपल्या पत्नीला घरी आणतो, तेव्हा त्याची पत्नी बदललेली असते. त्याला याबद्दलची माहिती एका विधीदरम्यान होते. यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी जातो. तेव्हा त्याला रवी किशन पोलीस स्टेशनमध्ये मजेशीर पद्धतीनं प्रश्न विचारतो. यानंतर तो आपल्या पत्नीबद्दल माहिती पोलिसांना देतो. चित्रपटाच्या ट्रेलरच्या शेवटी रवी किशन हा जेव्हा त्याच्या खऱ्या पत्नीचा फोटो मागतो, तेव्हा तो चेहरा झाकून असलेला फोटो देतो. यानंतर तिथे उपस्थित असलेले पोलीस हसतात.