मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील गाणी खूप जास्त प्रसिद्ध झाली आहेत. ही गाणी कुठल्याही कार्यक्रमात वाजली तर अनेकांना डान्स करण्याची इच्छा होते. आज आम्ही अशा काही गाण्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जे तुम्ही आपल्या प्ले लिस्टमध्ये सामील करून यावर सुंदर डान्स करून स्वत:चे मनोरंजन करू शकता.
1 कोंबडी पळाली :भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, कुशल बद्रिके, प्रिय बेर्डे अभिनीत 'जत्रा' या चित्रपटामधील 'कोंबडी पळाली' हे गाणं खूप हिट झालं आहे. हे गाणं अनेक कार्यक्रमात वाजविल्या जाते. या गाण्याला अजय-अतुल, यांनी संगीत दिलं आहे. 'जत्रा' चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. या गाण्यात भरत जाधव आणि क्रांती रेडकर हे कलाकार आहेत. 'कोंबडी पळाली' गाणं आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तसेच हे गाणं जितेंद्र जोशी यांनी लिहिलं आहे.
2 ही पोली साजूक : प्रथमेश परब, वैभव मांगले, केतकी माटेगांवकर स्टारर 'टाईम पास' चित्रपटामधील गाणी आणि डायलॉग हे खूप प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटामधील 'ही पोली साजूक' गाणं प्रचंड डिजेवर वाजविले जाते. हे गाणं खूप धमाकेदार आहे. या गाण्याला रेश्मा सोनवणे आणि मनोहर कोळंब्रे यांनी गायलं आहे. 'ही पोली साजूक' गाण्याला चिनार खारकर यांनी संगीत दिलं आहे. तसेच या गाण्यात प्रथमेश परब, केतकी माटेगांवकर आणि शिबानी दांडेकर हे कलाकार आहेत.