मुंबई - मराठी अभिनेता मकरंद अनसपुरेनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे काही गाजलेले चित्रपट आहेत, ज्यात त्यानं खूप जबरदस्त कॉमेडी केली आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या अशाच पाच चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जे खूप मजेशीर आहेत. आता तुम्ही हे चित्रपट घरी बसून पाहून आपले मनोरंजन करू शकता.
1. दोघात तिसरा आता सगळं विसरा : या चित्रपटाची कहाणी एका नवविवाहित जोडप्यांची आहे, ज्याचं आयुष्य घरात एक बालपणीचा मित्र आल्यानंतर उलथापालथ होते. या चित्रपटाची कहाणी खूप धमाकेदार आहे. 'दोघात तिसरा आता सगळं विसरा' चित्रपटात मकरंद अनसपुरे, प्रसाद ओक, मोहन जोशी, अमृता खानविलकर आणि मृण्मयी लागू हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन कंचन अधिकारी यांनी केलं होतं. हा चित्रपट 2008मध्ये प्रदर्शित झाला होता.
2. गाढवाचं लग्न : मकरंद अनसपुरे स्टारर मराठी भाषेतील हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजू फुलकर यांनी केलं आहे. 'गाढवाचं लग्न' चित्रपटात मकरंद अनासपुरे व्यतिरिक्त राजश्री लांडगे, संजय खापरे यांच्या विशेष भूमिका आहेत. हा 2006 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामधील मकरंदचा अभिनय अनेकांना आवडला होता.
3. दे धक्का : अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित 'दे धक्का' जबरदस्त चित्रपट आहे. 2006मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अमेरिकन चित्रपट लिटिल मिस सनशाईनवर आधारित आहे. या चित्रपटाची कहाणी एका निम्नवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारी आहे. या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे व्यतिरिक्त मेधा मांजरेकर , शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांच्या विशेष भूमिका आहेत. या चित्रपटाचा दुसरा भाग देखील खूप चर्चेत होता.
4. छपा काटा : जीवनातील गुंतागुंती शिकणाऱ्या, तरीही पारंपारिक मूल्यांमध्ये आनंद शोधणाऱ्या तीन कुटुंबांची विनोदी आणि सुंदर कहाणी या चित्रपटामध्ये दाखविण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे व्यतिरिक्त मोहन जोशी, विजय पाटकर, अरुण नलावडे, तेजस्विनी लोणारी, पंकज विष्णू आणि स्मिता ओक या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 2023 रोजी प्रदर्शित झाला. 'छपा काटा' चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप नवरे यांनी केलं आहे.
5. जाऊ तिथे खाऊ : 2007 रोजी प्रदर्शित झालेला 'जाऊ तिथे खाऊ' चित्रपटात मकरंद अनसपुरे (मुकुंद ) नोकरी शोधतो पण सर्व मुलाखतकार त्याच्याकडे लाच मागत असतात, त्यामुळे त्याला नोकरी मिळत नाही. भ्रष्ट व्यवस्थेमुळे निराश होऊन, तो याविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतो. हा चित्रपट अभय कीर्ती यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात मकरंद अनसपुरे व्यतिरिक्त कुलदीप पवार, चेतन दळवी, दीपाली सय्यद आणि दिव्या द्विवेदी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट खूपच गंमतीशीर आहे.