मुंबई - Kolkata Doctor Rape Murder : कोलकातामध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानं संपूर्ण देश शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या विरोधात सुरू असलेल्या संतापाच्या दरम्यान, बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानानं पीडितेवर एक कविता शेअर केली आहे. त्यानं आपल्या कवितेनं सर्वांच्या मनाला स्पर्श केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. आयुष्मान हा कोलकाता येथे झालेल्या बलात्कार-हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ एकता दाखवणारा पहिला सेलिब्रिटी आहे.
आयुष्मान खुराना भावनिक पोस्ट : आयुष्मान ही कविता ऐकून तुम्हीही भावूक व्हाल. त्यानं कवितेला 'काश मी मुलगा असतो' (काश मैं भी लडका होती.) असं शीर्षक दिलंय. त्यानं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या नवीन कवितेचा व्हिडिओ पोस्ट करत तुटलेल्या हार्टचा इमोजी जोडला आहे. ही कविता समाजातील स्त्री-पुरुष असमानता दर्शवते.
आयुष्मान खुरानाची कविता
मैं भी बिना कुंडी लगाकर सोती, काश मैं भी लड़का होती.
झल्ली बनकर दौड़ती उड़ती सारी रात दोस्तों के साथ फिरती,
काश मैं भी लड़की होती.
कहते सुना है सबको कि लड़की को पढ़ाओ लिखाओ सशक्त बनाओ.
और जब पढ़ लिखकर डॉक्टर बनती तो मेरी मां ना खोती उसकी आंखों का मोती,