नागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज प्रचारसभा मध्य आणि दक्षिण नागपुरातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लबोल केला. यावेळी महाविकास आघाडीच्या नावावर एक महाअनाडी गठबंधन असल्याचं ते म्हणाले. तर संपूर्ण देश नागपूर आणि महाराष्ट्राचा आभारी आहे. कारण महाराष्ट्रनं देशाला खूप काही दिल्याचं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे माझ्यावर का नाराज? : काँग्रेस पुन्हा जुन्या गोष्टी सांगून तुम्हाला जाती जातीत वाटत आहे. काँग्रेस पुन्हा महाराष्ट्राला लव्ह जिहाद आणि लँड जिहादमध्ये अडकवणार आहे. जेव्हा मराठवाड्यात रझाकार अत्याचार करत होते, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्र लिहून तिकडे असलेल्या दलित आणि गरिबांना इथे येऊ द्या असं सांगितलं होतं. त्या रझाकारने मल्लिकार्जुन खरगेच्या कुटुंबीयांची ही हत्या केली होती. खरगे रझाकारवर नाराज न होता खरगे माझ्यावर नाराज का होतात?. या वयात त्यांनी खरं बोललं पाहिजे असं देखील योगी आदित्यनाथ म्हणाले.
बटे थे इस लिये कटे थे : हिंदूंच्या गणेशोत्सव आणि रामनवमी मिरवणूकवर दगडफेक कशी होते. रझाकार याची हिम्मत कशी झाली, एवढ्या हिंदूंची हत्या कशी झाली होती. कारण तेव्हा 'बटे थे इस लिये कटे थे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे'. देशाच्या सीमा मोदींनी सुरक्षित केल्या, राम मंदिर बनवलं. हे काम काँग्रेसही करू शकत होतं. मात्र, काँग्रेसनं हे केलं नाही. काँग्रेसने मतांसाठी देशाच्या सीमांचं रक्षण केलं नाही. लव जिहाद, लँड जिहादच्या विरोधात कायदा होणं गरजेचं आहे. मात्र, हे काँग्रेस ते करू शकणार नाही. ज्यांच्या अजेंडामध्ये देश, महिला, शेतकरी, व्यापारी, तरुण नाहीत त्यांना निवडायची गरज नाही असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
हेही वाचा -