ETV Bharat / politics

पंतप्रधान मोदींचं महाविकास आघाडीला थेट आव्हान; म्हणाले, "राहुल गांधी यांच्या तोंडून..." - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पुण्यातील स.प.महाविद्यालय येथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2024, 10:49 PM IST

पुणे : विधानसभा निवडणुकीला सुरूवात झाली असून आत्ता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाला सुरवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसवर सातत्यान टीका करताना पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील 21 आणि सातारा जिल्ह्यातील 10 अशा एकूण 31 विधानसभा मतदासंघातील महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यातील स.प.महाविद्यालय येथं आज (12 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला थेट आव्हान दिलं. तसंच काँग्रेस समाजा-समाजांत फूट पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसनं महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान केला : प्रचार सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह 31 मतदारसंघातील उमेदवार उपस्थित होते. प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची अनेक वर्ष मागणी झाली, पण काँग्रेसनं कधी त्याची पूर्तता केली नाही. आम्ही हे काम करून आमची जबाबदारी निभावली. विदेशी गुलामगिरीची मानसिकता असलेल्या काँग्रेसनं महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान केला. काँग्रेसकडून वीर सावरकरांबाबत यांना सतत अपशब्द वापरले जातात. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक राहुल गांधी यांना करायला सांगा," असं थेट आव्हान मोदींनी महाविकास आघाडीला दिलं. "काँग्रेसला केवळ सत्ता हवी. काँग्रेस दलीत, आदिवासी, मागासवर्गीयांना तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. ओबीसी, एससी, एसटी यांच्यात वाद निर्माण करून त्यांना कमजोर करून आरक्षण काढण्याचं काम काँग्रेस करेल. त्यामुळं जनतेनं सावध राहावं," असं सांगत मोदींनी काँग्रेस समाजा-समाजांत फूट पाडत असल्याचा आरोपही केला.

महायुतीचं सरकार येईल : "महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल. पुणे आणि भाजपा यांचा संबंध विचार, संस्कार, आस्था असा आहे. महायुती सरकार आगामी काळात राज्याचा वेगानं विकास करेल. पुण्यात पुढील 5 वर्ष विकासाची, नवीन उड्डाण करण्याची असतील. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. या क्षेत्रात आयटी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नवनवीन गुंतवणूक होत असून स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांना फायदा झाला असून रोजगार निर्मिती झाली. पुण्यात मेट्रोचं जाळं विस्तारल्यामुळं वाहतूक कोंडी कमी झाली आहे. रिंगरोड, मीसिंग लिंक प्रकल्प यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे," असं प्रचार सभेत संबोधित करताना मोदी म्हणाले.

जनतेनं आम्हाला सेवा करण्याची संधी दिली : कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार बनलं, पण काँग्रेसनं निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासानांची पूर्तता केली नाही. केवळ घोटाळे समोर येत आहे. या लुटीचा पैसा महाराष्ट्रमध्ये पाठवून निवडणूक लढवली जात आहे. राज्याला वाचवण्यासाठी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे. काँग्रेसनं जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. महाराष्ट्रामध्ये कोऱ्या प्रती असलेल्या संविधानाच्या पुस्तकांचं वाटप काँग्रेसकडून केलं जात. सात दशक संविधान देशात लागू का नव्हतं? याबाबत त्यांनी भूमिका मांडावी. जम्मू-काश्मीरमध्ये संविधान प्रथमच लागू झालं, कारण जनतेनं आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. आम्ही कलम 370 जमिनीत गाडलं. या कलमानं जम्मू-काश्मीर देशापासून वेगळे ठेवलं, आतंकवादाला प्रोत्साहन दिलं. आज काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा डौलानं फडकत असून तिथे दिवाळी देखील साजरी झाली. सात दशकं जी भाषा पाकिस्तान बोलत होती, ती भाषा आज काँग्रेस बोलत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याची भाषा काँग्रेस करत आहे. हे देशातील जनता सहन करणार नाही," असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.

हेही वाचा

  1. "मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे"; एकनाथ शिंदेंच्या 'त्या' कृतीवर काँग्रेसची टीका
  2. शरद पवारांकडून छगन भुजबळांचा 'धोकेबाज' उल्लेख; भुजबळांनी केला मोठा गौप्यस्फोट
  3. "उद्धव ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करा", भाजपा महिला पदाधिकारी आक्रमक, नेमकं प्रकरण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.