महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कीर्ती सुरेश डिसेंबरमध्ये गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार? जाणून घ्या कोण आहे तिचा होणारा पती... - KEERTHY SURESH WEDDING

साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश या डिसेंबरमध्ये गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगमध्ये करणार असल्याची चर्चा आहे. तिनं याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नसला तरी लग्नाची तयारी सुरू असल्याचं समजतंं.

Actress  Keerthy Suresh
कीर्ती सुरेश ((Photo: IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 19, 2024, 6:22 PM IST

मुंबई - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सौंदर्यवती अभिनेत्री कीर्ती सुरेश या डिसेंबरमध्ये गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगमध्ये करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. तिचा कथित प्रियकर उद्योगपती अँटोनी थट्टिल याच्याशी लग्न करणार असल्याची माहिती आहे. अभिनेत्री कीर्तीकडून याबद्दलची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी, ती गेल्या 14 वर्षापासून शालेय मित्र असलेल्या अँटोनी थट्टिल याच्याशी रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगण्यात येतं.

एका न्यूजवायरनं दिलेल्या बातमीनुसार अँटोनी थट्टिल हे केरळमधील कोची येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे राज्यातील एक प्रसिद्ध रिसॉर्टची साखळी आहे. त्यांच्या लग्नाचा हा सोहळा 11-12 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. यासाठी वधू आणि वर यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यात सहभागी होतील. कीर्तीचे आई-वडील, ज्येष्ठ निर्माता-अभिनेता सुरेश कुमार आणि अभिनेता मेनका, या लग्नाबद्दल खूपच उत्साहित आहेत. गोव्यात आतापासूनच तयारीला सुरूवात झाली आहे आणि एका भव्य पण खासगी सोहळ्याचं आयोजन केलं जातंय.

या वर्षाच्या सुरुवातीला, कीर्तीनं तिच्या लग्नाभोवती सुरू असलेल्या चर्चेला सावधपणे उत्तर दिलं होतं. योग्य वेळी तिच्या नात्याविषयी कळवेन, असं ती म्हणाली होती. गेल्या वर्षी तिचं नाव एका वेगळ्या व्यक्तीबरोबर जोडलं जात असल्याबद्दल विचारलं असता तिनं ते फेटाळून लावलं होतं आणि तयारी झाल्यानंतर आपल्या "मिस्ट्री मॅन" विषयी सांगणार असल्याचंही ती म्हणाली होती.

दोन दशकापूर्वी बालपणीचं आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणारी कीर्ती, 'महानटी' सारख्या हिट चित्रपटांमुळे प्रसिद्ध झाली. यातील अभिनयासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. आगामी काळात ती 'बेबी जॉन' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती वरुण धवन, वामिका गाबी आणि जॅकी श्रॉफ यांच्या बरोबर सहकलाकार असणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'रिव्हॉल्व्हर रीटा' आणि 'कन्नी वेदी' सारख्या अनेक तमिळ आणि मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे.

25 डिसेंबर रोजी 'बेबी जॉन' चित्रपट रिलीज होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी तिचं लग्न होणार असल्यानं, कीर्ती सुरेशसाठी हा डिसेंबर लक्षात ठेवण्यासारखा असणार आहे. चाहते आता तिच्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details