मुंबई - Katrina kaif latest Photo :हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच दिग्गज अभिनेत्री आई झाल्या आहेत. अलीकडेच दीपिका पदुकोणनं गरोदरपणाची घोषणा करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आता आनंदाच्या बातमीमुळे रणवीर सिंग आणि दीपिकाचे चाहते खूप खुश आहेत. दीपिकानं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण तिला काळजी घेण्याचा सल्ला आणि शुभेच्छा दिल्या होत्या. आता चाहत्यांचं लक्ष कतरिना कैफवर आहे. ती कधी गुडन्यूज देईल याची वाट अनेकजण पाहात आहेत. 13 मार्च रोजी कतरिनानं सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर कतरिनाचे चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
कतरिनानं शेअर केला फोटो :कतरिना कैफनं फोटोत बहुरंगी ड्रेसवर मस्टर्ड जॅकेट घातलं आहे. याशिवाय तिच्या चेहऱ्यावर गोड हसू दिसत आहे. कतरिना कैफनं तिच्या या सुंदर फोटोबरोबर काउबॉय इमोजी शेअर केला आहे. कतरिनाचा हा फोटो एक लाखाहून अधिक चाहत्यांनी लाइक केला आहे. एका चाहत्यानं या फोटोच्या पोस्टमध्ये लिहिलं की, ''खूप सुंदर, सोज्वळ, अगदी वॉव दिसत आहे.'' आणखी एका चाहत्यानं या फोटोच्या पोस्टमध्ये लिहिलं, ''कतरिना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.'' अशा अनेक कमेंट्स या फोटोवर चाहते करताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहे.