महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यननं मॅक्लारेन जीटी कार का चालवत नसल्याचा केला खुलासा, सांगितली विशेष गोष्ट - kartik aaryan - KARTIK AARYAN

kartik Aaryan : कार्तिक आर्यननं मॅक्लारेन जीटी कार का चालवत नसल्याचं कारण सांगितलं आहे. 'चंदू चॅम्पियन'च्या प्रमोशन दरम्यान त्यानं याबाबत खुलासा केला आहे.

kartik Aaryan
कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन (IMAGE -IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 5:17 PM IST

मुंबई - kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या स्पोर्ट्स बायोग्राफिकल चित्रपट 'चंदू चॅम्पियन'मुळे खूप चर्चेत आहे. कार्तिकनं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. सध्या कार्तिक 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाबाबत कार्तिकनं अलीकडेच खुलासा केला होता की, तो भेट म्हणून मिळालेली मॅक्लारेन जीटी कार का चालवत नाही. 'भूल भुलैया 2' चित्रपट हिट झाल्यानंतर 'टी-सीरीज'चे मालक भूषण कुमार यांनी ही कार कार्तिक आर्यनला भेट दिली होती. एका मुलाखतीत कार्तिकनं सांगितलं की, मॅक्लारेन जीटी कार 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्यानं ती गॅरेजमध्ये उभी होती आणि तिथेच उंदरांनी मॅटला कुतरले. यानंतर त्याचा लाखोचा खर्च झाला.

भूल भुलैया फ्रँचायझी :यानंतर कार्तिकनं पुढं सांगितलं, "भूल भुलैया 2' हिट होण्याच्या निमित्तानं भूषण कुमारनं ही कार मला भेट दिली होती." 'भूल भुलैया 2 ' हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कार्तिक आर्यन व्यतिरिक्त कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत होती. कार्तिकचा हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटासाठी त्याचे कौतुक देखील करण्यात आले होते. या चित्रपटामधील गाणी देखील खूप गाजली होती. यापूर्वी 'भूल भुलैया'मध्ये अक्षय कुमार, शाहनी आहुजा, विद्या बालन , परेश रावल आणि इतर कलाकार दिसले होते. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला होता. हा चित्रपट 2007मध्ये रिलीज झाला होता.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : आता 'भूल भुलैया 3'मध्ये कार्तिक आर्यन व्यतिरिक्त विद्या बालन तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, परेश रावल आणि इतर कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहात आहेत. दरम्यान कबीर खान दिग्दर्शित, 'चंदू चॅम्पियन' चित्रपट भारताच्या पहिल्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मुरली पेटकरची कहाणी आहे. यात कार्तिक आर्यन त्यांची भूमिका साकारताना दिसेल. त्याच्या यशामागील अडचणी आणि संघर्ष या चित्रपटामध्ये मांडण्यात आला आहे. हा चित्रपट 14 जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. न्यूयॉर्कमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा मुलगी वामिकाबरोबरचा व्हिडिओ व्हायरल - Anushka Sharma and Virat Kohli
  2. कंगना राणौतच्या झापड मारण्याच्या घटनेवर एक्स बॉयफ्रेंड अध्यायन आणि शेखर सुमननं दिली प्रतिक्रिया - KANGANA RANAUT SLAP ROW
  3. शर्वरी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंग स्टारर चित्रपट 'मुंज्या' केलं जबरदस्त कलेक्शन - munjya box office collection day 1

ABOUT THE AUTHOR

...view details