महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार सलग 8 मिनिटांच्या सिंगल टेक वॉर सिक्वेन्सची झलक, ट्रेलरची उलटी गिनती सुरू - Chandu Champion trailer - CHANDU CHAMPION TRAILER

'चंदू चॅम्पियन'च्या ट्रेलरची प्रतीक्षा जवळपास संपली आहे. कार्तिक आर्यन स्टारर हा स्पोर्ट्स ड्रामाचा ट्रेलर 18 मे रोजी लॉन्च करण्यासाठी निर्मात्यांनी तयारी केली आहे.

Chandu Champion trailer
चंदू चॅम्पियन (Chandu Champion poster)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 1:27 PM IST

मुंबई - कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर १८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिकनं सैनिकाची भूमिका साकारली आहे. शत्रूवर धुँवाधार फायरिंग करतानाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आनंद झाल्याचं दिसतंय.

"आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीतील सर्वात अभिमानास्पद क्षण," असं म्हणतं आपल्या पोस्टमध्ये त्यानं गौरवशाली भारतीय सैन्यदलातील सैनिकाची भूमिका साकारत असल्याचं आणि चंदू चॅम्पियनच्या आयुष्यातील अनेक पैलूंपैकी हा एक असल्याचं म्हटलंय. या चित्रपटात 8 मिनिटांच्या सिंगल टेक वॉर सिक्वेन्सची झलक ही भारतीय सशस्त्र दलांना सलामी असल्याचा उल्लेखही कार्तिक आर्यननं आपल्या पोस्टमध्ये केला आहे. 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवताना निर्मात्यांनी चित्रपटाची नवनवीन पोस्ट रिलीज करुन प्रेक्षकांना गुंतवून ठेवलंय. यापूर्वीच्या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन गंभीर अवतारात दिसला होता.

आगामी चित्रपटात कार्तिक पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकरच्या भूमिकेत दिसणार आहे. मुरलीकांत हे भारतामधील पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते बॉक्सर होते. चित्रपटाच्या जाहीरातीतून हे स्पष्ट झालंय की त्यानं या भूमिकेसाठी त्याच्या शरीरात बदल करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. यासाठी त्यानं सुमारे 20 किलोग्राम वजन कमी केलं आणि साखर पूर्णपणे कमी केली. 'चंदू चॅम्पियन' हा साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांचा संयुक्तपणे निर्मिती केलेला चित्रपट आहे. 'बजरंगी भाईजान'च्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कबीर खानची ही नवीन कलाकृती 'चंदू चॅम्पियन' 14 जून रोजी रिलीज होणार आहे.

'चंदू चॅम्पियन' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन व्यतिरिक्त श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, राजपाल यादव, पलक लालवानी, विजय राज, भुवन अरोरा हे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो अनीस बज्मीचे दिग्दर्शन असलेला हॉरो-रकॉमेडी 'भूल भुलैया 3'मध्ये विद्या बालन आणि तृप्ती दिमरीबरोबर दिसणार आहे. सध्या कार्तिक या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याआधी या चित्रपटामधील अनेक फोटो सोशल मीडियावर कार्तिक शेअर केले होते. याशिवाय तो 'आशिकी 3' चित्रपटात झळकणार आहे. हंसल मेहता दिग्दर्शित 'कॅप्टन इंडिया' हे चित्रपटही त्याच्या हातात आहेत. कार्तिकने गँगस्टर हुसैन उस्तारावरील चित्रपटासाठी विशाल भारद्वाजबरोबर काम करणारअसल्याचं समजतंय.

हेही वाचा -

  1. रश्मिका मंदान्नाच्या अटल सेतू व्हिडिओची पंतप्रधान मोदींकडून दखल, पेड प्रचाराचा युजर्सकडून आरोप - Rashmika Atal Setu Video
  2. कान्स 2024च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनचा जलवा, मुलगी आराध्यानंही जिंकली मनं - Cannes 2024
  3. तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर 'अरमानाई 4' होईल हिंदीमध्ये रिलीज - tamannaah bhatia

ABOUT THE AUTHOR

...view details