मुंबई :दिग्गज राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत एक सोहळा होणार आहे. यात पंतप्रधान मोदीही सहभागी होईल. या विशेष कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी कपूर कुटुंबीय दिल्लीला गेले होते. यानंतर त्यांनी पीएम मोदी यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. आता कपूर कुटुंबातील सदस्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात पीएम मोदी हे कपूर कुटुंबियांबरोबर दिसत आहे. दरम्यान करीनानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं, 'आमचे आजोबा, दिग्गज राज कपूर यांचे सिनेसृष्टीतील योगदान आणि वारसा साजरा करण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केल्याबद्दल आम्ही खूप नम्र आणि सन्मानित आहोत. अशा खास दुपारसाठी श्री मोदीजींचे आभार.'
कपूर कुटुंबीय आणि पंतप्रधान मोदी यांची भेट : यानंतर करीनानं पुढं तिनं लिहिलं, 'आजोबांच्या कलात्मकतेची, दूरदृष्टीची आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाची 100 गौरवपूर्ण वर्षे साजरे करत असताना, आम्ही त्यांच्या वारशाचा सन्मान करतो, जो आम्हाला आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे. राज कपूर 100 फिल्म फेस्टिव्हल'द्वारे त्यांचे उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित करण्यात आणि भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांचा प्रभाव लक्षात ठेवण्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. 13-15 डिसेंबर 2024, 10 चित्रपट, 40 शहरे आणि 135 चित्रपटगृहे.' याशिवाय आलिया भट्ट, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर यांनी देखील पीएम मोदींबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.