हैदराबाद Samsung Galaxy S25 Ultra : Samsung लवकरच आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S25 Ultra लॉंच करण्याच्या तयारीत आहे. लीक्सनुसार, सॅमसंग 23 जानेवारी 2025 रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Galaxy S25 मालिका लॉंच करू शकते. हे फोन 6 फेब्रुवारीपर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकतो.
किंमत : Galaxy S24 Ultra ची किंमत Qualcomm च्या Snapdragon 8 Elite चिप सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळं आणि सामग्रीच्या वाढत्या किंमतीमुळं किंमत वाढू शकते. मात्र, सॅमसंगनं अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
डिझाइन आणि डिस्प्ले : डिव्हाइसमध्ये किरकोळ डिझाइन बदल होण्याची अपेक्षा आहे परंतु S24 अल्ट्राची प्रीमियम टायटॅनियम फ्रेम तशीच दिसण्याची शक्यात आहे. लीक्सनुसार, हा फोन 6.9-इंच डिस्प्ले, पातळ बेझल्स आणि अधिक अर्गोनॉमिक डिझाइनसह येण्याची शक्यता आहे. Samsung M13 OLED डिस्प्ले तंत्रज्ञान, M14 पॅनेल सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची शक्यता आहे. डिव्हाइसच्या रंग पर्यायांमध्ये जेड आणि गुलाबी सारख्या अनन्य रंगांसह टायटॅनियम, काळा, हिरवा आणि निळा समाविष्ट असू शकतो.
कॅमेरा आणि कामगिरी : सॅमसंग यावेळी आपल्या कॅमेरा प्रणालीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. अल्ट्रा-वाइड लेन्सला 12MP ते 50MP पर्यंत अपग्रेड मिळू शकते. टेलीफोटो कॅमेऱ्यात "व्हेरिएबल फोकल लेन्थ" असू शकते, ज्यामुळे झूम आणखी चांगलं होईल. दुसरी टेलीफोटो लेन्स काढून टाकण्याची शक्यता असली तरी, सॅमसंग फोर-लेन्स सेटअप कायम ठेवेल, असं दिसंतय.
स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिप : स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसह, हा फोन कार्यक्षमतेच्या बाबतीत चांगला असेल. सुरुवातीच्या बेंचमार्कनुसार, यात 40% वेगवान CPU आणि 42% चांगली GPU कामगिरी असेल. तसंच, RAM 16GB पर्यंत वाढू शकतं, ज्यामुळं मल्टीटास्किंग आणि AI कार्यक्षमता सुधारेल.
बॅटरी आणि सॉफ्टवेअर : बॅटरीची क्षमता 5,000mAh वर राहण्याची शक्यता आहे, परंतु स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपच्या सुधारित कार्यक्षमतेमुळं बॅटरी बॅकअप जास्त काळ असू शकतो. चार्जिंग गती 45W वर राहील. डिव्हाइस Android 15 सह One UI 7 वर चालेल आणि दीर्घ काळासाठी सॉफ्टवेअर मिळेल.
AI वैशिष्ट्ये : सॅमसंगकडून या फोनमध्ये AI फीचर्समध्ये आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये Bixby असिस्टंट आणि इतर ॲप्समध्ये जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञान जोडलं जाऊ शकतं. Galaxy S25 Ultra, त्याच्या सुधारणांसह, प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये मजबूत दावा करतंय. आता सॅमसंग ग्राहकांच्या अपेक्षांवर कसा खरा उतरतो हे पाहणं महत्वाचं आहे.
हे वाचलंत का :