मुंबई -कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2'च्या पुढील एपिसोडमध्ये कुठला खास पाहुणा येणार आहे, हे उघड झालंय. नेटफ्लिक्सवर रेखाबरोबरच्या एपिसोडमध्ये एक टीझर दाखविण्यात आला. या टीझरमध्ये शोमधील काही खास क्षण दाखविण्यात आले आहेत. कपिल शर्मा पुढील शनिवारी त्याच्या सीझनचा अंतिम भाग होस्ट करेल. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ची टीम दुसऱ्या सीझनचे 13 एपिसोड प्रसारित केल्यानंतर ब्रेकवर जाणार आहे. आता यामुळे अनेक प्रेक्षक नाराज झाले आहेत. मात्र आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या अतिंम भागमध्ये प्रेक्षकांना काही धमाकेदार पाहायला मिळणार आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन होईल समाप्त :'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या पुढील भागात 'बेबी जॉन' चित्रपटाची टीम पाहुणे म्हणून येणार आहे. कपिल शर्मा शोच्या शेवटच्या भागात 'बेबी जॉन'च्या टीमबरोबर धमाल करताना दिसणार आहे. आता अनेकजण या शोच्या आगामी एपिसोडसाठी आतुर आहेत. याशिवाय 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन आणखी एका कारणामुळे चर्चेत राहिला. रेखाबरोबरच्या एपिसोडच्या टीझरमध्ये कपिलनं घोषणा केली की, तो वरुण धवनला त्याच्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये घेऊन येत आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधील पाहुणे : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या शेवटच्या एपिसोडमध्ये वरुण धवनसह निर्माता अॅटली, दिग्दर्शक कलीज, वामिका गब्बी, कीर्ती सुरेश हे स्टार्स देखील आहेत. दरम्यान व्हायरल झालेल्या टीझरमध्ये वरुण धवन पोल डान्स करत आहे. याशिवाय कपिलची टीम आपल्या अनोख्या अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. या सीझनमध्ये करण जोहर आलिया भट्ट, गोविंदा, चंकी पांडे, शक्ती कपूर, रेखा, कार्तिक आर्यन, विद्या बालन, नवज्योत सिंग सिद्धू, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान, जूनियर एनटीआर, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, क्रिकेटर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या स्टार्स पाहुण्यांनी हजेरी लावली होती. याशिवाय या शोबद्दल बोलयाचं झालं तर यामध्ये कपिल शर्मासह कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोव्हर, राजीव ठाकूर , किकू शारदा, आणि अर्चना पूरण सिंग हे कलाकार आहेत. दरम्यान 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा अंतिम एपिसोड 8 वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.
हेही वाचा :
- शाहरुख खाननं भरला सर्वाधिक कर, कपिल शर्मानं अल्लू अर्जुनला टाकले मागे - shah rukh khan
- हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन 2 लवकरच होईल सुरू - kapil sharma
- 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो रिलीज, रॅपर बादशाह करणार 'सनसनाटी' खुलासा - The great indian kapil show