मुंबई : कॉलिवूड सुपरस्टार सूर्याचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'कांगुवा'ची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. शिवा दिग्दर्शित 'कांगुवा' हा चित्रपट 300 ते 350च्या बजेटमध्ये निर्मित केला गेला आहे, त्यामुळे या चित्रपटाचे यश खूप महत्त्वाचे आहे. दरम्यान या चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे. 'कांगुवा' बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात करेल असं सध्या संकेत देत आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. 'कांगुवा'च्या पहिल्या दिवसाच्या आगाऊ बुकिंगचे आकडे आता समोर आले आहेत. या चित्रपटानं पहिल्या दिवशी किती तिकिट विकल्या, याबद्दल जाणून घेऊया...
'कांगुवा' चित्रपटाचं आगाऊ बुकिंग : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'कांगुवा'च्या आतापर्यंत देशात पहिल्या दिवशी 51,609 तिकिटे विकली गेली आहेत. यामधून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 2.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा आकडा येणाऱ्या काळामध्ये आणखी वाढेल. 'कांगुवा' चित्रपटाच्या तिकिट तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधून जास्त विकल्या गेल्या आहेत. हा चित्रपट जगभरात 10,000 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. 'कांगुवा' तामिळ चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा रिलीज आहे. 'कांगुवा'मध्ये सूर्याशिवाय बॉबी देओल आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये बॉबी देओल हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.