मुंबई -कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' शुक्रवारी म्हणजेच 17 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. बॉलिवूड 'क्वीन' या विशेष दिवशी तिचा आगामी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये 99 रुपयांमध्ये दाखवणार आहे. कंगना राणौतचा बहुप्रतीक्षित राजकीय ड्रामा 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत फक्त 99 रुपये झाल्यानंतर आता तिचे चाहते खूप खुश आहेत. झी स्टुडिओज आणि मणिकर्णिका फिल्म्स निर्मित, 'इमर्जन्सी' चित्रपट 1975 मध्ये भारतावर लादल्या गेलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटात कंगना देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
कंगना राणौतचा चित्रपट कुठे प्रदर्शित होणार नाही : 'इमर्जन्सी' चित्रपटात कंगना राणौत व्यतिरिक्त अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही विशेष भूमिका आहेत. 'इमर्जन्सी'मध्ये अभिनय करण्यासोबतच कंगनानं या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलंय. 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये अनुपम खेर जयप्रकाश नारायण, मिलिंद सोमण फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, महिमा चौधरी पुपुल जयकर, श्रेयस तळपदे अटलबिहारी वाजपेयी, विशाल नायर संजय गांधी आणि दिवंगत सतीश कौशिक जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'इमर्जन्सी' चित्रपटावर बांग्लादेशमध्ये बंदी घातली गेली आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे तिथे हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही.