मुंबई - Indian 2 Trailer :साउथ फिल्म इंडस्ट्रीचा मेगास्टार कमल हासन त्याचा मोस्ट अवेटेड फिल्म 'इंडियन 2'मुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट आता रुपेरी पडद्यावर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल एक अपडेट शेअर केली आहे. आज, 25 जून रोजी सकाळी निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर याबद्दलची घोषणा केली आहे. लाइका प्रोडक्शननं मंगळवारी त्यांच्या अधिकृत एक्सवर पोस्टमध्ये लिहिलं, "उत्साहानं भरलेला 'इंडियन 2'चा ट्रेलर आज संध्याकाळी 7 वाजता रिलीज होणार आहे. सेनापतीच्या रोमांचक गाथेच्या झलकसाठी सज्ज व्हा."
'इंडियन 2'चा ट्रेलर आज होईल रिलीज :चित्रपटाचाट्रेलर रिलीज होण्यापूर्वी चेन्नईमधील मीडियाला दाखवण्यात आला. कमल हासन 'इंडियन 2' मध्ये कमांडरच्या भूमिकेत पुनरागमन करत आहे. या चित्रपटात कमल हासन व्यतिरिक्त सिद्धार्थ, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंह, प्रिया भवानी शंकर, विवेक, नेदुमुदी वेणू, गुलशन ग्रोवर, एसजे सूर्या आणि बॉबी सिम्हा यांसारखे अनेक स्टार्स आहेत. अनिरुद्ध रविचंदर यांनी 'इंडियन 2'ला संगीत दिलं आहे. या चित्रपटामध्ये एक चांगला संदेश समाजाला देण्यात येणार आहे. 'इंडियन 2' या ॲक्शन चित्रपटाचं दिग्दर्शन एस. शंकर यांनी केलं आहे. लायका प्रॉडक्शननं पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली आहे.