ETV Bharat / entertainment

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर बी टाउन सेलेब्सनं वाहिली श्रद्धांजली, सोशल मीडियाद्वारे केला शोक व्यक्त... - DR MANMOHAN SINGH

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. आता त्यांच्या निधनाचा शोक चित्रपटसृष्टीतील कलाकार करत आहेत.

dr manmohan singh passes away
डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन (Former Prime Minister Dr. Manmohan Singh (Photo: ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 16 hours ago

Updated : 16 hours ago

मुंबई : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि नोकरशहा म्हणून देशाची सेवा केली. एक पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द 2004-2014 पर्यंत होती. 26 डिसेंबर रोजी वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीत निधन झाल्यानंतर देशांतील सर्वांना मोठा धक्का बसला. त्यांनी अखेरचा श्वास एम्स (AIIMS) रुग्णालयात घेतला. मनमोहन यांच्यावर वय-संबंधित वैद्यकीय अटींवर उपचार सुरू होते. 26 डिसेंबर 2024 रोजी ते घरी अचानक बेशुद्ध पडले, यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील आपला शोक सोशल मीडियाच्या माध्यामातून व्यक्त केला आहे.

सनी देओल : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी सनी देओल, मनोज बाजपेयी, दिलजीत दोसांझपासून ते निम्रत कौरपर्यंतच्या कलाकारांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सनीनं आपल्या पोस्टमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली देत लिहिलं, 'भारताच्या आर्थिक उदारीकरणाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावणारे दूरदर्शी नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानं मला खूप दु:ख झालं आहे. त्यांची हुशारी, सचोटी आणि देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. मनःपूर्वक शोक.' भावपूर्व श्रद्धांजली डॉ. मनमोहन सिंग.'

कपिल शर्मा : कपिल शर्मानं डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पोस्टमध्ये लिहिलं, 'भारतानं आज आपला एक उत्कृष्ट नेता गमावला आहे. भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार, एकात्मता आणि नम्रतेचे प्रतीक डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रगती, आशेचा वारसा मागे सोडला आहे. त्यांच्या हुशारीनं, समर्पणानं आणि दूरदृष्टीनं आपल्या राष्ट्राचा कायापालट झाला. भावपूर्व श्रद्धांजली, डॉ. सिंग. तुमचे योगदान कधीही विसरता येणार नाही.'

निम्रत कौर : 'द लंच बॉक्स' फेम अभिनेत्री निम्रत कौरनं तिच्या एक्सवर श्रद्धांजली देत लिहिलं, 'एक विद्वान-राजकीय, भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार, अतुलनीय समजदारीनं आणि नम्रतेनं त्यांनी आपल्या राष्ट्राच्या जडणघडणीवर अमिट छाप सोडली आहे. डॉ. मनमोहन सिंगजी यांना भावपूर्व श्रद्धांजली. सतनाम वाहे गुरु.'

मधुर भांडारकर : दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'डॉ. मनमोहन सिंगजी यांच्या निधनानं एका युगाचा अंत झाला. भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून त्यांनी सार्वजनिक सेवेतील, त्यांच्या समर्पणानं आधुनिक भारताला आकार दिला आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना, ओमशांती.'

diljit dosanjh ( dr manmohan singh passes away)
दिलजीत दोसांझ (डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन) (diljit dosanjh)

रितेश देशमुख आणि दिलजीत दोसांझ : बॉलिवूड स्टार रितेश देशमुखनं वडील विलासराव देशमुख आणि मनमोहन सिंग यांचा एक फोटो शेअर करत लिहिलं, 'आज आपण भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावलं आहेत. भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारे, ते प्रतिष्ठा आणि नम्रता याचं उत्तम उदाहरण होते. आम्ही कायम त्यांचे ऋणी असू. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. धन्यवाद श्री मनमोहन सिंग जी.' याशिवाय दिलजीत दोसांझनं मनमोहन सिंग यांचा फोटो शेअर करत वाहेगुरू असं लिहिलं आहे.

मनोज बाजपेयी आणि संजय दत्त : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीनं शोक व्यक्त करत लिहिलं, 'आपल्या माजी पंतप्रधानांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं. आपल्या देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. भावपूर्वी श्रद्धांजली.' यानंतर संजय दत्तनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानं खूप दुःख झालं आहे, भारतासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.' याशिवाय साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन, रणदीप हुड्डा, दिशा पटानी यांनी देखील पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं कुटुंब : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुली आहेत. दमन सिंग, उपिंदर सिंग, आणि अमृत सिंग अशी त्यांची नावं आहेत. मनमोहन सिंग यांच्यावर आज शासकीय इतमामात संस्कार करण्यात येणार आहेत.

Last Updated : 16 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.