मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज 27 डिसेंबर रोजी आपला 59वा वाढदिवस साजरा करत आहे. आज सलमानच्या वाढदिवसानिमित्त 'सिकंदर'चे निर्माते एआर मुरुगदास चित्रपटाचा टीझर रिलीज करणार होते. मात्र, 26 डिसेंबर रोजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे टीझर लॉन्चची तारीख बदलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी पंतप्रधानांच्या निधनामुळे संपूर्ण जगात शोककळा पसरली आहे. दरम्यान 'सिकंदर'च्या टीझर रिलीजची नवी तारीखही आता घोषित केली गेली आहे. ॲक्शननं भरलेल्या या चित्रपटात सलमान खानचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
'सिकंदर'चा टीझर आता कधी होणार रिलीज ? : नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट, 'सिकंदर' चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर 'सिकंदर'चा टीझर पोस्ट केल्याची माहिती दिली आहे. सिकंदरचा टीझर आज 27 डिसेंबर रोजी सकाळी 11.07 वाजता रिलीज होणार होता. दरम्यान एक्सवर 'सिकंदर'च्या निर्मात्यांनी माजी पंतप्रधानांच्या निधनावर शोक व्यक्त करत लिहिलं की, 'आमच्या आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यानंतर, आम्हाला जाहीर करताना दुःख होत आहे की, 'सिकंदर'चा टीझर 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत रिलीज होईल, या दुःखाच्या प्रसंगी आमचे संवेदना देशाबरोबर आहेत, समजण्यासाठी धन्यवाद, टीम सिकंदर.'
You asked, and we heard you. Here’s our Biggest gift for all you @BeingSalmanKhan fans on Sikandar's birthday 🔥🔥
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) December 26, 2024
Stay Tuned for the #SikandarTeaserTomorrow at 11:07 AM 🔥https://t.co/CJ4DxIq0ky #SajidNadiadwala’s #Sikandar
Directed by @ARMurugadoss
Releasing in cinemas… pic.twitter.com/PMWqMZ8oHO
In light of the passing of our esteemed former Prime Minister Manmohan Singh Ji, we regret to announce that the release of the Sikandar teaser has been postponed to 28th December 11:07 AM. Our thoughts are with the nation during this time of mourning. Thank you for understanding.…
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) December 27, 2024
'सिकंदर'ची कधी होईल रिलीज ? : 'सिकंदर'च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर सलमान खानच्या वाढदिवसाला रिलीज करण्याची योजना आखली होती. यापूर्वी निर्मात्यांनी एक दिवस अगोदर 26 डिसेंबरच्या संध्याकाळी 'सिकंदर' चित्रपटातील सलमान खानचा फर्स्ट लुक शेअर शेअर केला होता. त्याचबरोबर आज 27 डिसेंबर रोजी सकाळी 11.07 वाजता चाहत्यांच्या नजरा या टीझर रिलीजवर खिळल्या होत्या, मात्र दुर्दैवानं डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशाला मोठा धक्का बसला. माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहताना, 'सिकंदर'च्या निर्मात्यांनी चाहत्यांना आणखी एक दिवस प्रतीक्षा करण्यास सांगितलं आहे. दरम्यान 'सिकंदर' चित्रपट रुपेरी पडद्यावर मार्च 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :