मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ऑनलाइन फसवणुकीबद्दल आता सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या पोस्टमध्ये त्यानं एका व्यक्तीबद्दल सांगितलं आहे, जो त्याचा मॅनेजर असल्याचं सांगून लोकांची फसवणूक करत आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना अर्जुन कपूरनं यावर लिहिलं, 'माझ्या लक्षात आले आहे की, एक व्यक्ती लोकांशी संपर्क साधत आहे आणि माझा मॅनेजर असल्याचा दावा करत आहे. याशिवाय तो त्या लोकांना माझ्याबरोबर कनेक्ट करून देईल असं देखील सांगत आहे. कृपया लक्षात घ्या, हे संदेश खरे नाहीत. तुम्ही कोणत्यांही लिंकवर क्लिक करू नये.'
अर्जुन कपूरनं केलं चाहत्यांना सावध : याशिवाय त्यानं पुढं पोस्टमध्ये लिहिलं, 'वैयक्तिक माहिती शेअर करू नये असं मला वाटतं, तुमचा ख्रिसमस सुरक्षित आणि आनंदी जावो.' आता अर्जुननं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे आता अर्जुनचे चाहते सावध होईल, हे मात्र नक्की. आजकाल सायबर गुन्ह्यात खूप वाढ झाली आहेत. अशी अनेक प्रकरणी समोर आली आहेत, की अभिनेता आणि अभिनेत्रीचं नाव घेऊन फसवणूक केली जात आहे.
अर्जुन कपूरचं वर्कफ्रंट : अर्जुन कपूरनं अलीकडेच वरुण धवनच्या 'बेबी जॉन' टीमला इंस्टाग्राम स्टोरीवरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानं चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना लिहिलं होतं, 'संपूर्ण टीमला यशासाठी शुभेच्छा!.' अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तो नुकताच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्यानं खलनायकाची भूमिका साकारली होती. अर्जुन कपूरबरोबर या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान आणि अक्षय कुमार सारखे स्टार्सही होते. 'सिंघम अगेन' चित्रपटात सलमान खाननं कॅमिओ केला होता. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' 1 नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. हा चित्रपट ठरला हिट झाला होता.
हेही वाचा :