मुंबई- Kamal Haasan First Look Poster:प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट उद्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रभास आणि साऊथचा सुपरस्टार कमल हासन यांच्यात मोठी लढत पाहायला मिळणार आहे. 'कल्की 2898 एडी'मध्ये कमल हासन खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कमल हासनचा खलनायकाचा लूक चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटामध्ये हासन यांचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळेल. आता या चित्रपटाच्या एक दिवस रिलीज आधी निर्मात्यांनी कमल हासनचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करून चाहत्यांना सुंदर भेट दिली आहे.
कमल हासनचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज : आज, 26 जून रोजी, 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कमल हासनचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करत लिहिलं,"हा सुप्रीम यास्किन आहे, चित्रपटाच्या रिलीजसाठी एक दिवस बाकी आहे." कमल हासन त्याच्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये अतिशय विचित्र व्यक्तीच्या रुपात दिसत आहे. रिपोर्टनुसार यास्किनच्या (कमल हसन) बॉडीचा आपोआप मृत्यू होत राहत असतो आणि त्याला त्याच्या शरीराची देखभाल करण्यासाठी काही लोकांच्या शरीराची आवश्यकता असते. यास्किन आणि कल्की (प्रभास) यांच्यातील युद्धात अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत प्रभासला साथ देताना दिसेल.