मुंबई - Kalki 2898 AD marks 1000 cr :साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या मिथॉलॉजी आणि सायन्स फिक्शन चित्रपट 'कल्की 2898 एडी'नं जगभरात बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'कल्की 2898 एडी प्रभासच्या करिअरमधील दुसरा 1000 कोटी कमवणारा चित्रपट ठरला आहे. 'बाहुबली 2' या चित्रपटानं पहिल्यांदा जगभरात बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार केला होता. प्रभासचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. 'कल्की 2898 एडी' 27 जून रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. आज हा चित्रपट 13 जुलै रोजी रिलीजचा 17 व्या दिवसात आहे. 'कल्की 2898 एडी'नं 16 दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर एक इतिहास रचला आहे. 'कल्की 2898 एडी'नं 16 दिवसांच्या डोमेस्टिक बॉक्स ऑफिस कलेक्शनसह शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला आहे. या चित्रपटानं 16 दिवसांत 550 कोटी रुपयांची कमाई देशांतर्गत केली आहे.
16 व्या दिवसाची कमाई : सॅकनिल्कनुसार, 'कल्की 2898 एडी'नं 16 व्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 5.2 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. याबरोबर या चित्रपटाचं देशांतर्गत कलेक्शन 548 कोटींवर पोहोचलं आहे. शनिवारी हा चित्रपट 550 कोटींचा टप्पा सहज पार करेल असं सध्या दिसत आहे. 'कल्की 2898 एडी' रविवारी 'ॲनिमल'च्या 553 कोटी रुपयांच्या देशांतर्गत कलेक्शनचा विक्रमही मोडणार आहे. दरम्यान 'कल्की 2898 एडी'नं शाहरुख खान स्टारर 'पठाण' चित्रपटाच्या 543.45 कोटी रुपयांच्या देशांतर्गत विक्रम मोडल्यानंतर, हा चित्रपट बॉक्स आणखी जास्त पैसे छापणार असं सध्या दिसत आहे. काही दिवसात 'कल्की 2898 एडी' 'पठाण'च्या जगभरातील 1048 कोटी रुपयांच्या कलेक्शनलाही मागे टाकेल.