महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"दीपिकाचं होणारं बाळ 'कल्की'सारखाच चित्रपट बनवेल", कमल हासनचे उद्गार - Kalki 2898 AD - KALKI 2898 AD

Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या चित्रपटातील मुख्य पात्रांचा समावेश असलेली मुलाखत शेअर केली. या व्हिडिओमध्ये, कमल हासन दीपिका आणि रणवीरच्या होणाऱ्या बाळाबद्दल बोलत आहेत.

Kalki 2898 AD
गर्भवती दीपिकाला पाहून कमल हासनचे उद्गार ((ANI image))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 5:23 PM IST

मुंबई - Kalki 2898 AD : नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' हा साय-फाय चित्रपट 2024 मधील एक अत्यंत मोठं आकर्षण आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या आधी निर्मात्यांनी प्रमुख स्टारकास्ट असलेली मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये, चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या हासनने दीपिका आणि रणवीरच्या मुलाबद्दल भाष्य करत, मुलानंही एक दिवस असाच चित्रपट बनवावा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे कलाकार नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपटाच्या सेटवरील त्यांच्या अनुभवांबद्दल चर्चा करताना दिसतात. ज्येष्ठ अभिनेता कमलनं पहिल्या दिवसाचं चित्रीकरण केलं तेव्हा नागी (दिग्दर्शक) कसे बोलावले याची आठवण करून देत दीपिकानं संभाषण सुरू केलं. तिनं स्पष्ट केले की नाग लहान मुलासारखा उत्साही होता. यावर कमल हासननं दीपिकाच्या पोटाकडे बोट दाखवत म्हटले: "या मुलाप्रमाणेच त्यानं हा चित्रपट बनवला आहे. मला आशा आहे की, हे मुल देखील एके दिवशी असा चित्रपट बनवेल."

गर्भवती दीपिकाला पाहून कमल हासनचे उद्गार ((Video source: ANI))

चित्रपटात अभिनेता प्रभासला अमिताभ बच्चन नडताना दिसतात. त्यामुळे या कृतीबद्दल त्याच्या चाहत्यांनी आपल्याला माफ करावं असं म्हणत बच्चन यांनी चर्चेतलं वातावरण हलकं फुलकं बनवलं. "कृपया मला माफ करा, प्रभासच्या चाहत्यांनो. मी हात जोडून माफी मागतो. चित्रपटात मी काय करतो ते पाहून मला मारू नका," असं म्हणत अमिताभ यांनी चित्रपटाबद्दल सांगितलं. बिग बी चित्रपटातील त्यांच्या आणि प्रभासमधील युद्धाच्या दृश्यांचा संदर्भ देत बोलत होते.

27 जून, 2024 रोजी 'कल्की 2898 एडी' हा मॅग्नम ओपस चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिलीजपूर्वी, निर्माते मथुरा, यूपी येथे भगवान कृष्णाच्या जन्मस्थानी कल्की चित्रपटाच्या म्युझीक थीमचं रिलीज करण्याची योजना आखली आहे. आज 24 जून रोजी कल्कीच्या थीमचे लॉन्चिंग केलं जाणार आहे.

हेही वाचा -

  1. 'कल्की 2898 एडी'ची ॲडव्हान्स बुकिंग सुरू, रिलीजपूर्वी भारतात 6 कोटीची केली कमाई - kalki 2898 ad
  2. कल्की 2898 एडी: अमिताभ बच्चन यांनी मागितली प्रभासच्या चाहत्यांची माफी, जाणून घ्या कारण - Amitabh Bachchan Seeks Apology
  3. सीमा भागातील प्रेक्षकांनी 'गाभ' चित्रपट पाहावा यासाठी मराठी हॉटेल व्यावसायिकाचा अनोखा उपक्रम - Marathi movie Gabh

ABOUT THE AUTHOR

...view details