महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shahid and Vijay : शाहिद कपूरनं प्राइम व्हिडिओच्या इव्हेंटमध्ये विजय देवरकोंडाचा घेतला किस - shahid kapoor kissed Vijay

Shahid and Vijay : अभिनेता शाहिद कपूर आणि साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाचा प्राइम व्हिडिओच्या इव्हेंटमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद विजयचा किस घेताना दिसत आहे.

Shahid and Vijay
शाहिद आणि विजय

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 4:47 PM IST

मुंबई - Shahid and Vijay : ओटीटीच्या जगात आगामी काळात चित्रपटांची कमतरता भासणार नाही, कारण 19 मार्च रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओनं 50 हून अधिक वेब सीरीज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. यात करण जोहर निर्मिती तीन वेब सीरीजचा देखील समावेश आहे. प्राइम व्हिडीओच्या वेब सीरीज लॉन्चिंग इव्हेंटमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी चित्रपटसृष्टीतील 'अर्जुन रेड्डी' विजय देवरकोंडा आणि 'कबीर सिंग' शाहिद कपूर स्टेजवर एकत्र दिसले. प्राइम व्हिडिओ इव्हेंटमध्ये शाहिद कपूर आणि साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा यांच्यामध्ये खूप प्रेम असल्याचं दिसलं.

शाहिद कपूरनं मानलं विजयचे आभार : या कार्यक्रमात दोन्ही स्टार्समध्ये आपुलकी पाहायला मिळाली. प्राइम व्हिडिओच्या इव्हेंटमध्ये शाहिद कपूरनं विजयचा आगामी चित्रपट 'फॅमिली स्टार' लॉन्च केला होता. विजय आणि शाहिदबरोबर 'फॅमिली स्टार' अभिनेत्री मृणाल ठाकूरही मंचावर उपस्थित होती. थिएटरमध्ये 'फॅमिली स्टार' रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर देखील स्ट्रीम केला जाणार असल्याचं आता सांगितलं जात आहे. यामुळे शाहिद हा खूप खूश झाला आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर हा विजयच्या खांद्यावर डोके ठेवून आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. शाहिदनं विजयचं 'अर्जुन रेड्डी' चित्रपटासाठी आभार मानलं आहेत.

शाहिद कपूरनं घेतला साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाचा किस : या व्हिडिओत शाहिदनं म्हटलं, ''मला विजयचे आभार मानायचे आहेत, कारण तू नसता तर 'अर्जुन रेड्डी' नसता आणि 'अर्जुन रेड्डी' नसता तर मी 'कबीर सिंग' नसतो, आय लव्ह यू विजय.'' यानंतर तो विजयच्या गालावर किस करतो. या कार्यक्रमामध्ये शाहिद कपूरनं 'अश्वत्थामा' चित्रपटाचीही घोषणा देखील केली आहे. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाईल. दरम्यान शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटामध्ये दिसला होता. आता पुढं तो 'देवा' आणि 'बुल' चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. RC 16 pooja ceremony : राम चरण स्टारर 'आरसी 16'च्या मुहूर्ताला स्टार कास्टसह दिग्गज स्टार्सची उपस्थिती
  2. Thalapathy Vijay : 'गोट'च्या शुटिंगसाठी केरळमध्ये आलेल्या थलपथी विजयला पाहायला आले लाखोच्या संख्येत चाहते
  3. 'डॉन 3' चित्रपटासाठी चर्चेत असलेली शोभिता धुलिपालानं प्रियांका चोप्राबरोबरचा फोटो केला शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details