मुंबई - Kriti Sanon :या वर्षाच्या सुरुवातीपासूनच क्रिती सेनॉन तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. आता ती 'क्रू' चित्रपटात तब्बू आणि करिना कपूर खानबरोबर दिसली होती. ती कबीर बहियाला डेट करत असल्याच्या सध्या चर्चा आहेत. मात्र ती कोणाला डेट करत आहे, याबाबत तिनं अद्यापही खुलासा केलेला नाही. दरम्यान, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तिनं भावी आदर्श जोडीदार कसा हवा याबद्दल खुलासा केला आहे. एका दिलेल्या मुलाखतीत क्रिती सेनॉनला विचारण्यात आलं की, ती कशाप्रकारच्या आदर्श जोडीदाराची अपेक्षा करेल.
क्रिती सेनॉन वैयक्तिक आयुष्याबद्दल केला खुलासा :यावर क्रिती हसली आणि म्हटलं, 'मला माहित नाही. मला हवं तसं माझ्यासारखं कुणी आहे की नाही कुणास ठाऊक? मला असं वाटते की , आपण अपेक्षा करतो की मला सुंदर मुलगा पाहिजे. आपण नेहमीच स्वतःवर खूप दबाव टाकतो. मला वाटते जे योग्य आहे ते सापडेल. यानंतर तिनं तिच्या तिला कसा जोडीदार हवा याबद्दल सांगत म्हटलं, "जो मला हसवू शकतो, ज्याच्याशी माझे चांगले नाते असले. माझ्याशी तासनतास बोलू शकतो आणि माझ्या कामाचा आदर करेल आणि मला वाटते की ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. नात्यात प्रामाणिकपणा असायला हवा. त्या व्यक्तीची विनोदबुद्धी चांगली असली पाहिजे आणि हो त्यानं माझी काळजी घेतली पाहिजे. नेहमी प्रेमासाठी वेळ काढला पाहिजे. प्रेम सुंदर आहे ते प्रेम गुंतागुंतीचे नको."