मुंबई Devara Part 1 : ज्युनियर एनटीआर स्टारर आगामी चित्रपट 'देवरा पार्ट 1' हा खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कोरतला सिवा यांनी केलंय. हा वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला या चित्रपटामध्ये एनटीआर अॅक्शन करताना दिसणार आहे. आता या चित्रपटामधील पहिला ट्रॅक 'फिअर' रिलीज होणार असल्याच्या चर्चा आहे. आज 19 मे रोजी या चित्रपटामधील गाणं रिलीज होणार आहे. दरम्यान निर्मात्यांनी रविवारी 'देवरा पार्टी 1'चं नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. आज संध्याकाळी 7.02 वाजता 'फेयर' गाणं प्रदर्शित होणार असून अनेकजण हे गाणं पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
'देवरा पार्ट 1' होईल 'या' दिवशी रिलीज : जान्हवी आणि सैफ अली खाननं 'देवरा पार्ट 1' या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. निर्मात्यांनी 'देवरा पार्ट 1' ची रिलीज तारीख 10 ऑक्टोबर 2024 निश्चित केली आहे. सध्या चित्रपटाची वाट अनेकजण आतुरतेनं पाहात आहेत. 'आरआरआर'च्या प्रचंड यशानंतर, ज्युनियर एनटीआर 'देवरा पार्ट 1' या चित्रपटामध्ये दिसला. सध्या या चित्रपटाची स्टार कास्ट या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. गेल्या शुक्रवारी निर्मात्यांनी या गाण्याचा प्रोमो रिलीज केला होता. 'फिअर' गाण्याचा प्रोमो अनेकांना आवडला होता. हे गाणं प्रसिद्ध गीतकार रामजोगय्या शास्त्री यांनी लिहिलं असून अनिरुद्ध यांनी संगीतबद्ध केलं आहे.