महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

लोकआग्रहास्तव सचिवची फुलेरा वापसी : 'पंचायत सीझन 3' च्या ट्रेलरने इंटरनेटवर वादळ - Panchayat Season 3

Panchayat Season 3 : 'पंचायत सीझन 3' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर बुधवारी शेअर करण्यात आला. या हलक्याफुलक्या कॉमेडी मालिकेत जितेंद्र कुमार, रघुबीर यादव आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Panchayat Season 3
पंचायत सीझन 3 (Panchayat Season 3 poster)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 3:56 PM IST

मुंबई - Panchayat Season 3 : पंचायत या गाजलेल्या वेब सीरिजची प्रतीक्षा प्रेक्षक गेल्या दोन वर्षापासून करत आहेत. अखेर आज ही प्रतीक्षा संपली आणि १५ मे रोजी 'पंचायत 3' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जितेंद्र कुमार, रघुबीर यादव आणि नीना गुप्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला पंचायतचा आगामी सीझन गावातील राजकारण आणि शत्रुत्व याच्या खोलात जाऊन भाष्य करताना दिसेल. अनेक हास्यास्पद आणि क्लेशकारक घटना यामध्ये पाहायला मिळतील.

ट्रेलर पाहून प्रतीक्षा करत असलेल्या मालिकेच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. लीक होण्याच्या भीतीने ट्रेलर थोडा लवकर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरला नेटिझन्सकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून मालिकेतील संवादांबद्दल त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला आहे.

ट्रेलर पुन्हा शेअर करताना, एका X युजरने लिहिले: "सुन रहे हो विंदो, हम वापस आ गये. २८ मे रोजी बहुप्रतिक्षित पंचायत सीझन३ प्राईम व्हिडिओवर. आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट भारतीय मालिकांपैकी एक "पंचायत"." आणखी एकाने ट्विट केले: "सचिव जी लौट आए हैं. पंचायत सीझन 3 के साथ." आणखी एका चाहत्याने म्हटले, "सर्वाधिक अपेक्षित वेबसिरीजचा ट्रेलर आला आहे."

दोन मिनिटे चौतीस सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये पंचायत सचिव जितेंद्र कुमार पुन्हा परतला असून त्यानं फुलेरा येथे सचिव म्हणून मुक्काम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा ट्रेलर पीएमच्या नवीन योजनेभोवती सुरू होतो यामुळे गावात वैर निर्माण होताना दिसते. ही गोष्ट सचिव म्हणून तो कसा हाताळतो हे पाहणे मनोरंजक असेल. चंदन कुमार लिखित आणि TVF निर्मित हलकीफुलकी मनोरंजन मालिका दीपक कुमार मिश्रा यांनी दिग्दर्शित केली आहे. जितेंद्र, नीना गुप्ता आणि रघुबीर व्यतिरिक्त, फैसल मलिक, चंदन रॉय आणि सान्विका मुख्य भूमिकेत आहेत. पंचायत सीझन 3 भारतात तसेच जगभरातील 240 पेक्षा जास्त इतर राष्ट्रे आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details