महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'जिगरा'मधील आगामी ट्रॅकमध्ये आलिया भट्टबरोबर दिसणार दिलजीत दोसांझ, नवीन गाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र - Alia Bhatt - ALIA BHATT

Alia Bhatt Diljit Dosanjh : आलिया भट्टनं तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पंजाबी गायक दिलजीत दोसांझबरोबर दिसत आहे.

Alia Bhatt Diljit Dosanjh
आलिया भट्ट दिलजीत दोसांझ (आलिया भट्ट-दिलजीत (@aliaabhatt Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 2:10 PM IST

मुंबई Alia Bhatt Diljit Dosanjh : अभिनेत्री आलिया भट्ट तिचा आगामी चित्रपट 'जिगरा'च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अलीकडंच, तिनं 'जिगरा'च्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती पंजाबी गायक दिलजीत दोसांझबरोबर असल्याची दिसत आहे. या दोघांच्या एकत्र फोटोमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. शुक्रवारी, 13 सप्टेंबर रोजी आलियानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आगामी 'जिगरा' चित्रपटाशी संबंधित माहिती शेअर केली. याबरोबर तिनं पंजाबी गायक दिलजीतबरोबरचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये "खुर्च्या सर्व काही सांगतात'" असं लिहिलं आहे.

आलिया भट्टनं केला दिलजीत दोसांझबरोबरचा फोटो शेअर : फोटोत आलिया आणि दिलजीत खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. आलियाच्या खुर्चीवर "द सैड कुडी" असं लिहिलं आहे. तिच्या शेजारी बसलेल्या दिलजीत दोसांझच्या खुर्चीवर "सिंग्ज अबाऊट कुडी" असं लिहिलं आहे. दोन्ही स्टार्स कॅमेऱ्याकडं पाठ करुन बसले आहेत. 'जिगरा' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आलियानं करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनबरोबर 'जिगरा'ची सहनिर्मितीही केली आहे. तिनं 2022 मध्ये पहिल्यांदा 'डार्लिंग्स' चित्रपटाची निर्मिती केली. दरम्यान 'जिगरा' चित्रपटामध्ये आलियाबरोबर 'द आर्चीज' फेम वेदांग हा दिसणार आहे. आलियाचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

आलियानं शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया : आलियानं हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्यानं कमेंट करत यावर लिहिलं की, "आलिया आणि दिलजीतची सुपरहिट म्युझिकल जोडी अधिकृतपणे तयार होत आहे, आम्ही खूप उत्साहित आहोत." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं की, "मी त्याच्या पुढील धमाकेदार गाण्याची प्रतीक्षा करू शकत नाही." आणखी एका यूजरनं लिहिलं, "दुसरा ब्लॉकबस्टर आहे, आता हे गाणं माझं नवीन आवडते होईल." याशिवाय अनेकजण या पोस्टवर फायर इमोजी शेअर करत आहोत. याआधी आलिया भट्ट आणि दिलजीत दोसांझ पहिल्यांदाच 'उडता पंजाब' चित्रपटातील 'इक कुडी' गाण्यात एकत्र आले होते. हे गाणं खूप हिट झालं होतं. आता दोघंही 'जिगरा'च्या नव्या गाण्यासाठी एकत्र येत आहेत.

हेही वाचा :

  1. आलिया भट्टनं नवीन पोस्टरसह 'जिगरा'च्या टीझर रिलीजची डेट केली जाहीर - ALIA BHATT
  2. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर 'अल्फा'चं शूटिंग काश्मीरमध्ये सुरू, फोटो व्हायरल - alia and sharvari pic viral
  3. छोट्या मुलांसाठी आलिया भट्टनं 'पिक्चर बुक' केलं लॉन्च - Alia Bhatt

ABOUT THE AUTHOR

...view details