महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूरनं श्रीदेवीच्या जन्मदिनानिमित्त तिरुपती मंदिराला दिली भेट, शिखर पहारियाबरोबरचा व्हिडिओ व्हायरल - Janhvi Kapoor - JANHVI KAPOOR

Sridevi Birth Anniversary: जान्हवी कपूरनं अलीकडेच आई श्रीदेवीच्या 61 व्या जन्मदिवसानिमित्त तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान या विशेष प्रसंगी ती कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबरोबर तिरुपती मंदिरातही गेली होती.

Sridevi Birth Anniversary
श्रीदेवीची बर्थ ॲनिव्हर्सरी (जाह्नवी कपूर (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 4:54 PM IST

मुंबई - Sridevi Birth Anniversary: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीचा आज 61वा जन्मदिवस आहे. दिवंगत आईच्या 61 व्या जन्मदिवसाच्या विशेष प्रसंगी तिची मुलगी जान्हवी कपूरनं नुकतीच आईची स्मृती जागवणारी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टची सुरुवात तिरुमला तिरुपती मंदिराच्या पायऱ्यांच्या फोटोनं केली, त्यानंतर तिनं तिच्या आईबरोबरचा बालपणीचा सुंदर फोटो शेअर केला. आता अलीकडेच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये ती कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबरोबर तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेताना दिसत आहे.

जान्हवी कपूरनं घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन : श्रीदेवीच्या 61व्या जन्मदिनानिमित्त जान्हवीनं कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबरोबर आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीला भेट दिली. दरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत जान्हवी ही पारंपरिक लूकमध्ये आहे. दुसरीकडे शिखरनं धोतर नेसून मंदिरात प्रवेश केला. जान्हवीनं मंदिराच्या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये जान्हवीनं "हॅपी बर्थडे मम्मा, आय लव्ह यू" असं कॅप्शन लिहिलं आहे. या फोटोंवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. जान्हवी कपूरनं सोशल मीडियावर पोस्ट करताच अनन्या पांडे आणि सान्या मल्होत्रा ​​यांनी कमेंट विभागात रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

जान्हवी कपूरची पोस्ट : एका चाहत्यानं यावर लिहिलं, "आई आणि मुलीची सुंदर जोडी." दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा श्रीदेवीजी, आम्हाला तुमची आठवण येते." आणखी एकानं लिहिलं, "आम्ही तुम्हाला श्रीदेवीजी मिस करतो, भारतीय चित्रपटसृष्टीत तुमची अनुपस्थिती कोणीही पूर्ण करू शकत नाही." जान्हवी कपूर शेवटी 'उलझ' या चित्रपटात दिसली आहे, याशिवाय ती राजकुमार रावबरोबर 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मध्येही दिसली होती. यात तिनं क्रिकेटरची भूमिका साकारली होती. आता पुढं ती 'देवरा पार्ट 1' या चित्रपटात साऊथ स्टार ज्युनियर एनटीआरबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट या वर्षी रुपेरी पडद्यावर सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर यांनी श्रीदेवीची आठवण काढत वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट - Khushi Kapoor remembered Sridevi
  2. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा पार्ट 1'मधील 'धीरे धीरे' गाणं रिलीजसाठी सज्ज - devera part 1
  3. 'उलझ' आणि 'औरों में कहाँ दम था'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली धक्कादायक कमाई - 1 Days Box Office Collection

ABOUT THE AUTHOR

...view details