महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूरनं राधिका मर्चंटच्या ब्राइडल शॉवरमधील फोटो केले शेअर , पाहा फोटो - janhvi kapoor share pics - JANHVI KAPOOR SHARE PICS

Janhvi Kapoor : राधिका मर्चंटच्या ब्राइडल शॉवरचे फोटो जान्हवी कपूरनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवीची गर्ल गँग प्री-वेडिंग कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत आहे.

Janhvi Kapoor
जान्हवी कपूर

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 1:44 PM IST

मुंबई -Janhvi Kapoor : राधिका मर्चंट लवकरच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीबरोबर विवाह करणार आहे. गेल्या महिन्यातच अंबानी यांनी अनंत आणि राधिकासाठी प्री-वेडिंग फंक्शन आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात परदेशातील पाहुण्यांपासून तर बॉलिवूड आणि क्रिक्रेट जगतातील अनेकांनी हजेरी लावली होती. या प्री-वेडिंग कार्यक्रमाची बरीच चर्चा झाली होती. आता सोशल मीडियावर राधिकाच्या ब्राइडल शॉवरचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो बॉलिवूडमधील अभिनेत्री जान्हवी कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम पेजवर आज 15 एप्रिल रोजी पोस्ट केले आहेत.

राधिका मर्चंटच्या ब्राइडल शॉवरचे फोटो जान्हवीनं केले शेअर :जान्हवीनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'प्रिन्सेस डायरीज रॉयल स्लंबर पार्टी सर्वात खास वधूसाठी.' याशिवाय जान्हवीनं हा फोटो तिच्या गर्ल गँगला टॅग केला आहे. या फोटोमध्ये जान्हवीची गर्ल गँग आणि मुलांची गँग या प्री वेडिंग कार्यक्रमाचा आनंद घेत आहे. जान्हवीनं शेअर केलेले फोटो अनेकांना आवडत आहेत. अनेकजण या पोस्टच्या कमेंट्स विभागात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ब्राइडल शॉवरसाठी गुलाबी रंगाची थीम निवडण्यात आली होती. फोटोमध्ये जान्हवी, राधिका आणि इतर मुली गुलाबी फुलांच्या थीमशी जुळणारे नाईटवेअर ड्रेसमध्ये पोझ देताना दिसत आहेत. तसेच या फोटोमध्ये फक्त राधिकानं पांढऱ्या लाउंजवेअर सेट परिधान केला आहे, ज्यामध्ये ती अधिक सुंदर दिसत आहे.

जान्हवी कपूरचं वर्कफ्रंट :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाचे ठिकाण आणि पाहुण्यांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी ती 'दोस्ताना 2'मध्ये कार्तिक आर्यनबरेबर दिसली होती. याशिवाय पुढं ती 'देवरा' या तेलुगू चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआरबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. तसेच जान्हवी 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी', 'बडे मियाँ छोटे मियाँ', ' तख्त' आणि 'आरसी 16' चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. जेलमधून सुटल्यानंतर 22 दिवसांनी एल्विश यादवनं खरेदी केली करोडोंची आलिशान कार, पाहा व्हिडिओ - Elvish Yadav
  2. सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर रणदीप हुड्डानं शेअर केली पोस्ट - randeep hooda
  3. "मैदान पाहणं चुकवू नका" म्हणत, सौरव गांगुलीनं केलं अजय देवगणचा चित्रपट पाहण्याचं आवाहन - Ajay Devgn starrer Maidan

ABOUT THE AUTHOR

...view details