मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'चा 5 वा सीझन सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या शोमध्ये टास्कदरम्यान सदस्यांची भांडणे पाहायला मिळतात. 'बिग बॉस'नं दिलेल्या टास्कमुळे यंदाचा सीझन खूप गाजत आहे. टास्क झाल्यानंतर घरातील समीकरणांमध्येही बदल होताना दिसत आहे. बुधवारी पार पडलेल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये निक्की तांबोळी , अरबाज पटेल , वैभव चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांच्या मैत्रीत फूट पडणार असल्याचं दिसणार आहे. आता 'बिग बॉस' निर्मात्यांनी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अरबाज पटेल , वैभव चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर एकत्र बसलेले दिसत आहेत.
जान्हवी किल्लेकर देणार वैभव आणि अरबाजला धक्का : या प्रोमोमध्ये जान्हवी वैभव आणि अरबाजला म्हणते, "आता यापुढे मी तुमच्या विरोधात खेळणार आहे. तुम्ही मला सेकंड राऊंडमध्ये कॅप्टन्सीमधून उडवलं?" यावर वैभव म्हणतो," निक्कीनं तुला काढलं आहे." यानंतर जान्हवी पुढं विचारते, "निक्कीला माझ्या कॅप्टनसीबद्दल काय प्रॉब्लेम आहे. मी एकटी खेळत असले तरी एक कुठेतरी आपल्यात मैत्री होती ना? आता आपण एकमेकांच्या विरोधाच खेळू." यानंतर अरबाज आणि वैभव हे दोघेही गोंधळात दिसतात. कॅप्टन्सीपदाच्या टास्कमध्ये दुसऱ्या फेरीत निक्की अरबाजला आर्या आणि जान्हवी यांना नॉमिनेट करण्यास सांगते. अरबाज हा निक्कीचं ऐकून आर्या आणि जान्हवीला कॅप्टन्सीपदाच्या रेसबाहेर काढतो.