मुंबई - अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'स्काय फोर्स' 24 जानेवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या अक्षय त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. 'स्काय फोर्स'च्या प्रमोशन दरम्यान अक्षयला विचारण्यात आलं की, भारतीय चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरण्यामागील कारण काय आहे. यावर त्यानं म्हटलं, "ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आगमनामुळे आणि त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहेत." तसेच संवादादरम्यान अक्षयनं त्याच्या आगमी चित्रपटाबद्दल देखील माहिती दिली आहे.
अक्षय कुमारनं केलं विधान : अक्षयनं चित्रपटांच्या अपयशावर बोलताना पुढं म्हटलं, 'मी बऱ्याच लोकांना भेटलो आणि त्यांच्याकडून एकच गोष्ट ऐकत आहोत, आपण हे चित्रपट ओटीटीवर पाहू शकतो. बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप होण्याचे हेच सर्वात मोठं कारण आहे. कोविडनंतर लोकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्याची सवय लागली. आता त्याना याची सवय झाली आहे." सध्या अक्षय कुमारला 'स्काय फोर्स' चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर वीर पहाडिया दिसणार आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटाद्वारे वीर हा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
अक्षयचा आगामी चित्रपट : 'स्काय फोर्स' हा अक्षयचा 2025 मधील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि निमृत कौर या दिसणार आहेत. तसेच या चित्रपटानंतर अक्षय 'भूत बंगला', 'हाऊसफुल 5', 'जॉली एलएलबी 3', ''हेरा फेरी 4', 'वेलकम टू द जंगल' शंकर', आणि 'भागम भाग 2' यामध्ये दिसणार आहेत. अक्षयचे यापूर्वी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. 2024 मध्ये अक्षय 'खेल खेल में', 'सरफिरा' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता, मात्र हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाही. 2023 मध्येही त्याचा 'सेल्फी' आणि 'मिशन राणीगंज' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते. दरम्यान 'स्काय फोर्स' या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अक्षयची अॅक्शन पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :