मुंबई - माजी 'मिस इंडिया' अभिनेत्री नम्रता शिरोडकर आज 22 जानेवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. सध्या नम्रता चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ती आता पूर्ण वेळ तिच्या कुटुंबाला देत आहे. दरम्यान या विशेष प्रसंगी पती महेश बाबूनं तिला सोशल मीडियाच्या माध्यामातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं आपल्या पोस्टवर लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, एनएसजी!' प्रत्येक दिवस उजळ आणि चांगला बनवल्याबद्दल धन्यवाद.' याशिवाय तिची मुलगी सितारानं देखील एक सुंदर पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं तिच्या पोस्टवर लिहिलं, 'मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मी भाग्यवान आहे. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, अम्मा.'
नम्रता शिरोडकरबद्दल : दरम्यान 1993मध्ये 'मिस इंडिया'चा किताब जिंकलेल्या नम्रतानं बॉलिवूड आणि साऊथमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. 'मिस इंडिया'चा किताब मिळाल्यानंतर तिनं मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला होता. यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. 1998 मध्ये, नम्रतानं सलमान खानबरोबर 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिची एक छोटी भूमिका होती. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री ट्विंकल खन्ना होती. यापूर्वी नम्रतानं 'पूरब की लैला पश्चिम का छैला' हा चित्रपट साइन केला होता, मात्र काही कारणामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
नम्रता शिरोडकरचे चित्रपट : यानंतर नम्रतानं 'कच्चे धागे' (1999), 'वास्तव: द रिअॅलिटी' (1999) या चित्रपटांमध्ये काम केलं. तिचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. या चित्रपटांच्या यशामुळे तीनं बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं होतं. याशिवाय तिनं मल्याळम चित्रपट 'एझुपुन्ना थरकन' (1999)मध्ये काम केलं होत. मात्र हा चित्रपट तिचा फ्लॉप ठरला होता. यानंतर तिनं 'पुकार' (2000)मध्ये अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितबरोबर स्क्रिन शेअर केली होती. तसेच नम्रतानं 'अस्तित्व' (2000), 'दिल विल प्यार व्यार' (2002), 'एलओसी कारगिल' (2003) आणि 'ब्रिटिश सिनेमा ब्राइड एंड प्रेजुडिस' (2004) या चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनय केला आहे.
नम्रता शिरोडकरचं नाव जोडलं गेलं साऊथ सुपरस्टारबरोबर : बॉलिवूडनंतर नम्रतानं साऊथ चित्रपटांमध्ये नशीब आजमावलं. 2000मध्ये 'वामसी' या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिची भेट साऊथ स्टार महेश बाबूशी झाली. यानंतर या दोघांनी 5 वर्षे डेटिंग केलं. 2005मध्ये या दोघांनी लग्न केलं. एका मुलाखतीत असं सांगण्यात आलं होत की, महेश बाबूला त्यांच्या पत्नीनं काम करावं असं वाटत नव्हतं, त्यामुळे नम्रतानं अभिनय सोडला. नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूला दोन मुले आहेत, मुलगा गौतम कृष्ण आणि मुलगी सितारा अशी त्यांची नावे आहेत. नम्रता 53 वर्षांच्या वयातही खूपच क्यूट दिसते. अनेकदा नम्रता नो-मेकअप लूकचे फोटो शेअर करत असते.
हेही वाचा :
- 'एसएसएमबी29' चित्रपटाच्या पूजा समारंभात महेश बाबू पहिल्यांदाच राजामौली यांच्याबरोबर झाला स्पॉट
- कृष्ण जन्माष्टमीनिमित्त महेश बाबूच्या आवाजासह 'मुफासा: द लायन किंग'चा तेलुगु ट्रेलर प्रदर्शित - Mufasa The Lion King
- "तेजस्वी ताऱ्यप्रमाणं चमकत राहा" म्हणत, महेश बाबू, नम्रता शिरोडकरनं लेक सितारावर केला प्रेमाचा वर्षाव - Sitara Ghattamaneni Birthday