मुंबई Jacqueline Fernandez Easter :जैकलीन फर्नांडिस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. जॅकलीन फर्नांडिसनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या चाहत्यांना इस्टरच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तिचा हा फोटो अनेकांना आवडला आहे. या फोटोवर अनेकजण भरभरुन कमेंट्स करुन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये तिनं डंगरी ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती खूप क्यूट दिसत आहे. फोटोत जॅकलीन हातात अंड असून हसतमुख पोझ देताना दिसत आहे. याशिवाय तिच्या दुसऱ्या हातात एक बासकेट आहे, ज्यामध्ये काही खाण्याचे पदार्थ आणि वस्तू दिसत आहेत.
जॅकलीन फर्नांडिसनं दिल्या चाहत्यांना शुभेच्छा :जॅकलीननं शेअर केलेल्या फोटोवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, ''जॅकलीन मी तुझा खूप मोठा चाहता आहे, तुझा प्रत्येक फोटो हा खूप सुंदर असतो. दुसऱ्या एका चाहत्यानं या फोटोवर लिहिलं, ''जॅकलीन तुला इस्टरच्या खूप खूप शुभेच्छा'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, ''या फोटोमुळे माझा आजचा दिवस खूप सुंदर जाणार, तू खूप सुंदर दिसत आहे.'' याशिवाय काहीजण फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. जॅकलीन फर्नांडिसनं याआधी होळीचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती खूप खास दिसत होती. तिनं या होळीचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, ''हॅपी होली रंग लीला '24 कोलकाता.''