महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

शिलाँगच्या स्टीव जिरवानं जिंकली 'इंडियाज बेस्ट डान्सर 4'ची ट्रॉफी - INDIAS BEST DANCE

'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4'चा विजेता शिलाँगचा स्टीव जिरवा झाला आहे. हा शो जिंकल्यानंतर स्टीवनं आपला आनंद व्यक्त केल आहे.

indias best dancer season 4
इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 (instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 11, 2024, 10:14 AM IST

मुंबई -'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4'च्या आता विजेत्याचं नाव समोर आलं आहे. यावेळी या शोची ट्रॉफी स्टीव जिरवानं जिंकली आहे. या शोमध्ये स्टीवला ट्रॉफीचं नाही तर एक कार आणि 15 लाख रुपयांची बक्षीस रक्कमही मिळाली आहे. याशिवाय या शोमध्ये कोरिओग्राफर रक्तीम ठाकुरिया यांनाही 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळालं आहे. स्टीव्हसह हर्ष केसरी, नेक्शन, नेपो, आकांक्षा मिश्रा उर्फ ​​अकिना आणि आदित्य मालवीय हे फायनलमध्ये होते. मात्र स्टीवनं सर्वांची मनं जिंकून बाजी मारली. 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4' या शोमधून करिश्मा कपूरनेही जज म्हणून टीव्हीवर पदार्पण केलं आहे.

करिश्मा कपूरनं केला आनंद व्यक्त : याशिवाय करिश्मा कपूरबरोबर या शोमध्ये गीता कपूर आणि टेरेन्स लुईस हे देखील जज म्हणून एकत्र दिसले. या शोचं होस्टिंग जय भानुशाली आणि अनिकेत चौहान यांनी केलं होतं. दरम्यान स्टीव्हच्या विजयावर आनंद व्यक्त करताना, करिश्मानं म्हटलं , "जेव्हा त्यानं पहिल्यांदा परफॉर्म केलं, तेव्हापासून त्यानं आपली एक अद्भुत प्रतिभा निर्माण केली होती. त्यानं त्याच्या डान्सनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. स्टीवनं आपल्या लाइव्ह वायर परफॉर्मन्सनं या प्लॅटफॉर्मवर एक नवीन पॅरामीटर सेट केला आहे. हा एक कठीण निर्णय होता. पण तो खरोखरच विजयाला पात्र आहे आणि त्याच्या यशाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे."

स्टीव जिरवानं केल्या भावना व्यक्त :याशिवाय आपल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना स्टीव म्हटलं, "इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4' जिंकणे हे एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. हा प्रवास आव्हानांनी भरलेला होता, ज्यामध्ये दीर्घ तासांचे प्रशिक्षण, समर्पण आणि सतत शिकणे यांचा समावेश होता. मात्र मी यशस्वी झालो. माझे कोरिओग्राफर रक्तीम ठाकुरिया आणि या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली, त्या सर्वांचा मी खूप आभारी आहे. हा विजय केवळ माझाच नाही तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा आहे.'' 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4' ची स्पर्धा तीन महिन्यांपासून सुरू होती. याशिवाय आता 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4'च्या जागी 'आयबीडी वर्सेस एसडी चॅम्पियन्स का टशन' हा शो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या शोचे जज रेमो डिसूझा आणि मलायका अरोरा असणार आहेत. आता हा नवीन शो सोनी टीव्हीवर16 नोव्हेंबरपासून प्रसारित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details