मुंबई :भारतीय-अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात, चंद्रिका टंडननं दक्षिण आफ्रिकेच्या बासरीवादक वाउटर केलरमॅन आणि जपानी सेलिस्ट इरु मात्सुमोतो यांच्याबरोबर 'त्रिवेणी' अल्बमवर काम केलं होतं. या अल्बमसाठी त्यांना, बेस्ट न्यू एज एम्बिएंट ऑर चैंट अल्बम अवॉर्डनं पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 'त्रिवेणी'साठी ग्रॅमी जिंकल्यानंतर, रेकॉर्डिंग अकादमीला दिलेल्या बॅकस्टेज मुलाखतीदरम्यान, चंद्रिका टंडननं आपला आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं, 'हे खूप छान आहे'.
भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला, वाचा सविस्तर - CHANDRIKA TANDON
भारतीय वंशाच्या गायिका चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी 2025 पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Feb 3, 2025, 3:26 PM IST
चंद्रिका टंडन मिळाला ग्रॅमी पुरस्कार :बेस्ट न्यू एज, एम्बिएंट ऑर चैंट अल्बम श्रेणीत काही लोक देखील नामांकित झाले होते, यात रयूची सकामोटोची ओपस, रिकी केजची ब्रेक ऑफ डॉन, राधिका वेकारियाची वॉरियर्स ऑफ लाइट आणि अनुष्का शंकरची चॅप्टर 2: हाउ डार्क इट इज बिफोर डॉन यांचा समावेश होता. चंद्रिका टंडनचे हे दुसरे ग्रॅमी नामांकन होते. 2009मध्ये त्या विजयी होऊ शकल्या नव्हत्या. दरम्यान न्यूयॉर्क येथील कन्सल्टंट जनरल ऑफ इंडियानं त्यांच्या अधिकृत एक्सवर चंद्रिका यांना शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. चंद्रिका या पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांच्या बहिण आहे. यावर्षीचे ग्रॅमी पुरस्कार अनेक कारणांमुळे चर्चेत होते. दरम्यान कान्ये वेस्ट आणि त्यांची पत्नी बियांका सेन्सोरी यांना पोलिसांनी शोमधून बाहेर काढले होते.
चंद्रिका टंडन कोण आहे? :चंद्रिका टंडन या एक भारतीय-अमेरिकन गायिका आहे तसेच त्या एक उद्योजक आहे. चंद्रिका यांचे सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण भारतात झाले आहे. यानंतर त्यांनी चेन्नईमध्ये मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना आयआयएम अहमदाबादमधून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. मॅककिन्से अँड कंपनीमध्ये भागीदार म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला होत्या. चंद्रिकाचे शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहेत. न्यूयॉर्क विद्यापीठातील टंडन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या मंडळाच्या अध्यक्षा आणि एसटीईएम ( STEM) शिक्षणाच्या प्रमुख म्हणून, त्या काम करत आहे. 2005 मध्ये, त्यांनी जागतिक कल्याणासाठी संगीताचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवून, स्वतःचे नॉन प्रॉफिट म्यूजिक लेबल, सोल चैंट्स म्यूझिकची स्थापना केली होती. आता ग्रॅमी पुरस्कारा हा आपल्या नावावर करून त्यांनी इतिहास रचला आहे.