मुंबई - T20 World Cup 2024 :टी - 20 विश्वचषक 2024 सुरु झाला आहे. काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. या सामन्यासाठी सर्वजण खूप उत्सुक होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर भारत हा अडचणीत वाट होता. मात्र यानंतर भारतीय संघानं शानदार पुनरागमन करत धमाकेदार विजय मिळवला. भारतीय टीमच्या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाच वातावरण आहे. दरम्यान विजयाचा आनंद बॉलिवूडनेही साजरा केला आहे. भारताच्या विजयाबद्दल सर्व सेलिब्रिटींनी काही पोस्ट शेअर केल्या आहेत. भारतानं पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून ट्वेन्टी - ट्वेन्टी विश्वचषकात सलग दुसरा विजय मिळवला आहे.
बॉलिवूड स्टार्सनं भारतीय संघाचं केलं अभिनंदन :वरुण धवननं त्याच्या इंस्टा स्टोरीवर सामन्यादरम्यानचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "काय सामना आहे, काय कामगिरी आहे, टीम इंडिया! जय हिंद." यानंतर अमिताभ बच्चन यांनीही भारतीय संघाचे कौतुक करत लिहिलं, "अरे बाप रे बाप! आम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहत होतो आणि आम्ही हरणार आहोत असे वाटल्यावर मध्येच टीव्ही बंद केला! पण अचानक मी इंटरनेट पाहिलं आणि आपण जिंकलो हे कळलं. इंडिया, इंडिया, इंडिया." तसेच सिद्धार्थ मल्होत्रानेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर भारतीय संघाचा फोटो पोस्ट करून आपला उत्साह शेअर करत लिहिलं, "काय विजय, टीम इंडिया, हॅपी संडे!"