मुंबई - Palak Tiwari-Ibrahim Ali Khan Dating: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हे लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. पलक आणि इब्राहिमच्या डेटिंगच्या अफवा खूप दिवसांपासून पसरल्या आहेत. या कथित जोडप्यानं डेट करत असल्याच्या बातम्या अनेकदा फेटाळून लावल्या होत्या. दरम्यान त्याच्या नाताबद्दलची एक बातमी समोर आली आहे. पलक आणि इब्राहिमच्या जवळच्या एक सुत्रानं त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. हे कथित जोडपे गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान करत आहे डेट ? : पलकचं नात इब्राहिमच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. मात्र या कथित जोडप्याला त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत यायचे नाही. सध्या दोघांनाही आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. पलक आणि इब्राहिम एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहेत. याशिवाय दोघेही एकमेकांना अधिक जाणून घेत आहेत. पलक आणि इब्राहिमची भेट साडेतीन वर्षापूर्वी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांना भेटू लागले आणि डेटवर जाऊ लागले. आता त्याच्यातील नात खूप घट्ट झालं आहे. इब्राहिम हा अनेकदा पलकची काळजी घेताना दिसतो. या कथित जोडप्याला अनेकदा पापाराझीनं एकत्र पकडलं आहे.