महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वडिलांच्या नावानं बांधलेल्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी रवीना टंडन झाली भावूक - रवीना टंडन झाली भावूक

Raveena Tandon : रवीना टंडननं वडिलांच्या नावानं बांधलेल्या स्मारकाचे उद्घाटन केलं आहे. या उद्घाटन सोहळ्यात तिच्या कुटुंबातील काही सदस्य यावेळी उपस्थित होते.

Raveena Tandon
रवीना टंडन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 11:12 AM IST

मुंबई - Raveena Tandon : हिंदी चित्रपट सुंदर अभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती ग्लॅमर स्टाइलमुळे नाही तर वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आली आहे. रवीनानं मुंबईतील जुहू येथे वडील रवी टंडन यांच्या नावानं एका चौकाचे उद्घाटन केलं आहे. सोशल मीडियावर रवीना टंडनचे चाहते तिच्या कामाचं खूप कौतुक करत आहेत. रवी टंडन चौकाच्या उद्घाटन सोहळ्यात रवीना, तिची आई आणि मुलगी राशा यांच्यासह अनेक कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी रवीना भावूक झाली होती.

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मोठी भेट : रवीना टंडननं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वडिलांच्या नावावर असलेल्या चौकाचं उद्घाटन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर तिचे चाहते आणि काही सेलिब्रिटी तिच्या कामाचं कौतुकही करत आहेत. रवीना, तिची आई आणि मुलगी यांच्यासह कुटुंबातील प्रत्येकजण या व्हिडिओमध्ये आनंदी दिसत आहेत. रवीनाची आई गुलाबी रंगाच्या सूटमध्ये आहे. रवीनानं पांढऱ्या रंगाचा सूट घातला आहे आणि राशानं काळ्या रंगाचा पोशाखात परिधान केला आहे. ही पोस्ट शेअर करत रवीनानं लिहिलं, ''हॅप्पी बर्थडे पापा, रवी टंडन चौक 17 फेब्रुवारी 2024.'' आता सोशल मीडियावर रवीनाचे चाहते तिला खूप धाडसी मुलगी असल्याचं म्हणत आहेत.

रवीनाचं वर्कफ्रंट :11 फेब्रुवारी 2022 रोजी रवीनाचे वडील रवी टंडन यांचं श्वसनाच्या आजारामुळे निधन झाले होते. आता रवीनानं वडिलांना वाढदिवसानिमित्त ही खास भेट दिली आहे. रवीनाच्या फिल्म वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरीजमध्ये दिसली होती. या वेब सीरीजमध्ये तिनं 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. याशिवाय पुढं ती अक्षय कुमारबरोबर 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट कॉमेडी ड्रामा असणार आहे. 'वेलकम टू द जंगल' चित्रपटामध्ये अक्षय आणि रवीना व्यतिरिक्त संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, श्रेयस तळपदे आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'छावा'च्या शूटिंगमध्ये हात फ्रॅक्चरही होऊन विकी कौशलची जिद्द, म्हणाला "थांबू शकत नाही"
  2. "हिंमत नही छोडना, बस्स !" आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानच्या वडिलांना ऑफर केली थार
  3. हिरव्या रंगाच्या पोशाखात सजली वधू रकुल प्रीत सिंग, ढोल नाईटसह लग्नाच्या उत्सवाला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details