महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हंसिका मोटवानीने पतीबरोबर नवीन घरात केला प्रवेश, गृहप्रवेश पूजेचे फोटो शेअर झाले व्हायरल

अभिनेत्री हंसिका मोटवानीने तिच्या नवीन घरात पती सोहेल कथुरियाबरोबर गृहप्रवेश केला आहे. आता तिनं पूजेमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

By ETV Bharat Entertainment Team

Published : 4 hours ago

Updated : 2 hours ago

hansika motwani
हंसिका मोटवानी (हंसिका मोटवानी - (इंस्टाग्राम))

मुंबई -दक्षिणेकडच्या चित्रपटांसह मोजक्या हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्याहंसिका मोटवानीनं नव्या वास्तूत प्रवेश केला आहे. हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया' या चित्रपटातील बालकलाकार ते टॉलिवूडमधील स्टार बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास खूप संघर्षमय होता. आजही हंसिकाच्या चाहत्यांना तिचे चित्रपट पाहायला आवडतात. हंसिकानं 4 डिसेंबर 2022 रोजी सोहेल कथुरियाबरोबर लग्न केलं. अलीकडेच या जोडप्यानं नवीन घर विकत घेतलंय. हंसिकानं तिच्या नवीन वास्तूच्या पूजेची झलक शेअर केली आहे.

हंसिका मोटवानीचं नवीन घर :हंसिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती सोहेल कथुरियाबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ती तिच्या घरातील पूजेसाठी, पूजा-हवन करताना दिसत आहे. या खास प्रसंगी हंसिकानं हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसली होती. यावर तिनं कॉन्ट्रास्टिंग, गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला होता. याशिवाय तिनं गजरा बन, सोन्याचा हार आणि यावर जुळणारे कर्ण आभूषणांसह, बांगड्या घालून तिचा लूक पूर्ण केला होता. या लूकमध्ये ती खूप आकर्षक दिसत आहे. तिचा पती सोहेल कथुरियानं फिकट हिरव्या रंगाची शेरवानी घातली होती.

हंसिका मोटवानीनं बीएमडब्लू 6 ( BMW 6) सीरीज खरेदी केली :काही दिवसांपूर्वी हंसिकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या बीएमडब्लू सारीज 6ची झलक दाखवली होती. सुंदर पांढऱ्या रंगाची कार घेतल्यानंतर तिनं आपला आनंद हा पोस्टद्वारे व्यक्त केला होता. दरम्यान हंसिकाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बाल कलाकार म्हणून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. ती 2000 मध्ये 'शका लाका बूम बूम'मध्ये दिसली होती. यानंतर ती एकता कपूरच्या 'सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेत झळकली. हंसिका शेवटची 2024 मध्ये 'गार्डियन' या हॉरर चित्रपटात दिसली होती. आता पुढं ती 'रोदया बेबी' या तामिळ चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिचा हा चित्रपट नोव्हेंबर 2024मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जेम राजा सर्वानननं केलंय.

Last Updated : 2 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details